Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha: ३०७ दारू विक्रेत्‍यांवर गुन्‍हे दाखल; अवघ्या १६ दिवसातील कारवाई

३०७ दारू विक्रेत्‍यांवर गुन्‍हे दाखल; अवघ्या १६ दिवसातील कारवाई

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : जिल्ह्यात दारुबंदी असतानाही अवैध दारुविक्रीने डोके वर काढले होते. अनेकांचे संसार दारुमुळे उद्ध्वस्त झाले. दारुविक्रीवर (Wardha) लगाम लावण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. मात्र, त्या सर्व उपाययोजना फोल ठरल्या. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी कार्यभार स्वीकारताच दारु विक्रेत्यांना सळो की पळो लावले असून अवघ्या १६ दिवसांत जिल्ह्यातील विविध (Police) पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई सत्र राबवून तब्बल ३४ लाख ९१ हजार ७६८ रुपयांचा देशी विदेशी दारुसाठा जप्त करुन ३०७ दारु विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले. या कारवाईमुळे दारू विक्रेत्यांमध्ये धडकी भरली. (Tajya Batmya)

दारुबंदी असतानाही ठिकठिकाणी दारु विक्री सुरु होती. शहरातील (Wardha News) अनेक पानटपऱ्यांवर दारुची विक्री केली जात होती. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारुअड्डे निर्माण झाले होते. गावठी दारुभट्ट्याही वाढल्या होत्या. मात्र, पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना निर्देश देत दारु विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपआपल्या हद्दीतील दारु विक्रेत्यांना दारु न विकण्याबाबत सांगितले. काहींनी ऐकले तर काही मुजोर दारु विक्रेत्यांनी न ऐकल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

दारू विक्रेते झाले अंडरग्राऊंड

पोलीस अधीक्षकांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांसह दारु विक्रेत्यांमध्ये धास्ती भरली आहे. अनेक दारु विक्रेत्यांनी शहरातून पलायन केले. तर काही अंडरग्राउंड झाल्याचे चित्र आहे. एकंदरित अशी कारवाई निरंतर राहिल्यास दारु विक्रीला पूर्णपणे लगाम लागेल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri 2025: नवरात्र सुरू होण्यापूर्वी घरातील नकारात्मक वस्तू काढा, नाहीतर येतील अनेक अडथळे

Vastu Tips For Money: घरात कासवाची मूर्ती ठेवल्याने कोणते लाभ होतात?

Pulao Recipe : साहित्य कमी मात्र रेसिपी चवदार, झटपट बनवा 'हा' चटपटीत पुलाव

Maharashtra Live News Update: वाशिम सह रिसोड,मालेगांव तालुक्याला पावसाने झोडपलं

Empty Stomach: रात्री उपाशीपोटी झोपल्याने भोगावे लागतील 'हे' दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT