Wardha Crime Saam tv
महाराष्ट्र

Wardha Crime : बँकेत हातचलाखी करून फसवणूक करणारा ताब्यात; साडेचार हजार रुपये केले जप्त

Wardha News : वाघाडे यांनी पैसे मोजले असता त्यात १६ हजार कमी मिळून आल्याने, त्यांनी या संदर्भात पुलगाव पोलिसात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: बँकेमध्ये हातचलाखी करून लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Police) अटक केली. त्याने चोरलेल्या १६ हजार रुपयांपैकी साडेचार हजार रुपयांची रोख (Wardha) त्याच्या ताब्यातून जप्त केली. नासिर अली आमीर अली (वय ४५, रा. येरखेडा, तह. कामठी, जि. नागपूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Maharashtra News)

बाभूळगाव बोबडे (ता. देवळी) येथील रंजना दिगांबर वाघाडे यांनी २० फेब्रुवारीला पुलगाव येथील बँक ऑफ इंडिया शाखेतून बचतगटाचे ४० हजार रुपये काढले. ते पैसे (Bank) बँकेतील एका खुर्चीवर बसून मोजत होत्या. दरम्यान, एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आला. पैसे मोजण्याच्या बहाण्याने त्याने पैसे स्वतः जवळ घेतले. (Crime) यानंतर हातचलाखी करून परस्पर १६ हजार रुपये घेऊन पळून गेला. वाघाडे यांनी पैसे मोजले असता त्यात १६ हजार कमी मिळून आल्याने, त्यांनी या संदर्भात पुलगाव पोलिसात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या प्रकरणातील संशयित आरोपी नासिर अली आमीर अली नागपूर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर त्यास घरून ताब्यात घेत चौकशी केली. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याने फसवणूक करून चोरी केलेल्या १६ हजार रुपयांपैकी काही रक्कम त्याच्या आईच्या उपचाराकरिता खर्च केली असल्याचे सांगितले. मात्र उर्वरित ४ हजार ७१० रुपये त्याच्याकडून जप्त करीत पुलगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक संतोष दरेकर, मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, संजय बोगा, विनोद कापसे, अभिषेक नाईक यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ration Card : रेशन कार्डवर PHH की AAY? तुमच्या कुटुंबाला महिन्याला किती किलो धान्य मिळणार, लगेच तपासा

Maharashtra News Live Update: गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, 22 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

Dates vs Raisins : खजूर की मनुका, दोघांपैकी काय आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर

Less Water Drinking: दिवसभर पाणी कमी पिण्याची सवय ठरू शकते धोकादायक; शरीरावर होतात 'हे' ७ परिणाम

Childhood Cancer: पालकांनो! मुलांमध्ये दिसणारी ही 5 लक्षणं दुर्लक्षित करू नका; कॅन्सरचा असू शकतो सुरुवातीचा संकेत

SCROLL FOR NEXT