Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Crime: मुलीला मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार; पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : तुझी मुलगी शाळेत जाते, तिला रस्त्यात पकडून तिच्यावर अत्याचार करेल; नाही तर मला तुझ्याशी संबंध प्रस्थापित करु दे, अशी धमकी देत ६२ वर्षीय इसमाने ३५ वर्षीय महिलेवर निर्जनस्थळी नेत अत्याचार केला. ही घटना पुलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या येसगाव येथे घडली. अत्याचारच्या घटनेनंतर पीडितेने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने हा धक्कादायक प्रकार उजेडात आला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल करुन बेड्या ठोकल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Breaking Marathi News)

सुधाकर काळमेघ (६२) रा. येसगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. संशयीत आरोपी सुधाकर हा मागील काही महिन्यांपासून पीडितेला तिच्या मुलीच्या मैत्रीला माझ्याबद्दल सांग; माझ्याशी बोलायला लाव, असे म्हणत तगादा लावत होता. पीडितेने त्याला ती माझ्या मुलीसारखी आहे; असे म्हणून त्याला हटकले होते. पीडिता ही काही महिलांसोबत आरोपी सुधाकर याच्या शेतात निंदायला गेल्या होत्या. दुपारी १२ वाजताच्या दरम्यान पीडिता विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली असता आरोपीने तिला अडवून मला तुझ्यासोबत संबंध प्रस्थापित करायचे आहे, असा तगादा लावला.

नाईलाजाने दिला होकार

पीडितेने आरोपीस नकार दिला असता नराधमाने तु संबंध ठेवू दिले नाही तर तुझ्या मुलीला रस्त्यात अडवून तिच्याशी संबंध प्रस्थापित करेल, अशी धमकी दिली. अखेर पीडितेने घाबरुन जात त्याला होकार दिला. यानंतर नराधमाने महिलेला निर्जनस्थळी नेत अत्याचार केला. तसेच आरोपी व त्याच्या दोन मुलांनी बदनामी केल्याने पीडितेने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला जखमी अवस्थेत सावंगी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. पोलिसांनी तत्काळ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली. सध्या पीडितेची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरविषयी माहित नसलेल्या गोष्टी

Navratri Special Dish: नवरात्रीसाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न पडलाय का?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

MVA News : मविआचा जागावाटपाचा तिढा सुटणार?

IND vs BAN 1st Test: W,W...आकाश 'दीप' पेटला! लागोपाठ 2 चेंडूंवर उडवल्या त्रिफळा; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT