Nandurbar: चोरीला गेलेल्या १६ चाकी डम्परचा लागला शोध; जीपीएस काढून पोलिसांची केली होती दिशाभूल

चोरीला गेला १६ चाकी डम्परचा लागला शोध; जीपीएस काढून पोलिसांची केली होती दिशाभूल
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

नंदुरबार : महिनाभरापूर्वी सारंगखेडा शिवारातील पेट्रोल पंपावरून चोरीस गेलेला ५७ लाख रुपये किंमतीचा १६ चाकी हायवा टिप्पर अर्थात डम्परचा शोध लावण्यात नंदुरबार एलसीबीला (Nandurbar LCB) यश आले आहे. नाशिक (Nashik) येथून हा टिप्पर ताब्यात घेण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे. चोरीतील मुख्य संशयित फरार झाला आहे. (Tajya Batmya)

Nandurbar News
Heavy Rain: ढगफुटी सदृश्य पाऊस; आष्टी तालुक्यातील अनेक गावांचा तुटला संपर्क

शहादा (Shahada) तालुक्यातील सारंगखेडा शिवारातील श्रीकृष्ण पेट्रोल पंपावरून २ सप्टेंबरला चोरट्यांनी रऊफ रशीद खाटीक (रा. प्रकाशा) यांचा ५७ लाखांचा हायवा टिप्पर चोरीस गेला होता. तब्बल ५७ लाखांचे वाहन चोरीस (Theft) गेल्याने खळबळ उडाली होती. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी लागलीच एलसीबीचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना तपासाचे आदेश दिले.

जीपीएस काढून फेकले अन्‍य ट्रकमध्‍ये

डम्परला लावलेल्या जीपीएसचे लोकेशन घेतले असता वाहन (Sarangkheda) सारंगखेडा, शहादा, निझरमार्गे सुरत येथे गेल्याचे समजले. सुरत येथे जीपीएस लावलेले वाहन शोधले असता तो एक ट्रक निघाला. चोरट्यांनी जीपीएस काढून ते दुसऱ्या वाहनात फेकले. जेणेकरून पोलिसांची दिशाभूल होऊ शकेल. त्यानंतर पोलिसांनी शहादा, शिरपूर, धुळे या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयित आरोपी बल्ला हा नाशिक येथे आडगाव परिसरात येणार असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली. त्यानुसार पथक तेथे गेले.

अखेर डंपर व आरोपी ताब्‍यात

नाशिक– धुळे महामार्गावर डी मार्टसमोर चोरीस गेलेला टिप्पर अर्थात डम्पर उभा असलेला दिसला. पथकाने खात्री करून डम्परमध्ये बसलेल्या व्यक्तीस ताब्यात घेतले व विचारपूस केली. त्याने मनजीतसिंग कशमीर सिंग (रा. वॉटर सप्लाय गल्ली, अमृतसर, हल्ली मुक्काम संत जनार्दन अपार्टमेंट आडगाव नाका, नाशिक) असे नाव सांगितले. याच वेळी डम्पर जवळून एक कार सुसाट निघाली. त्यात गुरुमुखसिंग उझे बल्ला असल्याचे स्पष्ट झाले. त्यालाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक रवींद्र कळमकर, सहायक निरीक्षक संदीप पाटील, हवालदार पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, विकास कापुरे, किरण मोरे, यशोदीप ओगले यांच्या पथकाने केली. ५७ लाखांच्या डम्पर चोरीचा गुन्हा उघडकीस आणल्याने पथकाला बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com