Ashti News Saam tv
महाराष्ट्र

Ashti News : निर्दयतेचा कळस; विष कालवले अन्न टाकले खायला; विषबाधेने १६ कुत्र्यांचा मृत्यू

Wardha News : वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथे असलेल्या मोकाट कुत्रांच्या होणाऱ्या त्रासातून अमानुष कृत्य करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. यात अन्नात विष कालवून खाण्यात देत कुत्र्यांना जीवे ठार मारण्यात आ

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: मोकाट कुत्रे परिसरात फिरत असतात. अनेकांना यांचा त्रास होत असतो. मात्र या मुक्या प्राण्यांवर निर्दयतेचा कळस गाठण्याचा प्रकार वर्धाच्या आष्टी येथे घडला आहे. आष्टी बसस्थानकाजवळ अनोळखी व्यक्तीने अन्नामध्ये विषारी पदार्थ टाकून कुत्र्यांना खाण्यास टाकले. हे विष कालवलेले अन्न खाल्ल्याने तब्बल १६ भटक्या श्वानांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घडली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. 

शहरातील सर्वच रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तर अनेकांना चावा घेतल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. अशाच प्रकारे वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथे असलेल्या मोकाट कुत्रांच्या होणाऱ्या त्रासातून अमानुष कृत्य करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यात अन्नात विष कालवून खाण्यात देत कुत्र्यांना जीवे ठार मारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

पोलिसात तक्रार दाखल 

दरम्यान सदर घटना पीपल फॉर ऍनिमल संस्थेचे सदस्य आणि प्राणीमित्र हिरामण भोयर यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ मृत्यूशी झुंज देत असलेल्या काही श्वानांवर औषधोपचार करत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा देखील मृत्यू झाला आहे. तसेच अमानुष कृत्य करणाऱ्याचा छडा लावून कडक कारवाईची मागणी केली आहे. तर या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

मृत श्वानांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी  

तक्रार दाखल होताच आष्टीचे ठाणेदार राजेश जोशी यांनी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गुंजन थोटे यांना शवविच्छेदनासाठी पत्र दिले. डॉ. थोटे यांनी मृत श्वानांचे शवविच्छेदन करून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले. अहवालानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, भटक्या श्वानांची वाढती संख्या हा आष्टी शहरातील गंभीर प्रश्न बनला आहे. आष्टी नगर पंचायतने ठोस उपाययोजना करण्याची मागणी देखील केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अत्यल्प उत्पन्नामुळे खचलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवलं

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले अन् सांगितलं कारण

Peacock Green Colur Saree Design: महिलांसाठी मोरपंखी कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न्स पाहून खूश व्हाल

SCROLL FOR NEXT