चेतन व्यास
वर्धा : मुंबईच्या बीकेसी मैदानावर बुधवारी शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याकरिता वर्धा (Wardha) जिल्ह्यातूनही बसने कार्यकर्ते रवाना झाले आहेत. जिल्ह्याच्या आठ तालुका मिळून एकूण 12 बस मुंबईला (Mumbai) रवाना करण्यात आल्या आहे. (Wardha News Dasara Melava)
वर्धेच्या शिंदे गटाच्या कार्यालयासमोरून सकाळी बसला झेंडा दाखवून (Dasara Melava) रवाना करण्यात आले आहे. शिंदे गटाच्या कार्यालयासमोरून कार्यकर्त्यांनी भरलेली बस शिंदे गटाचे संपर्क प्रमुख राजेश सराफ यांनी झेंडा दाखवून रवाना केली. जिल्ह्यातून 12 बसने हे कार्यकर्ते रवाना करण्यात आले आहे. मेळाव्यावरून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पहावायास मिळत आहे.
ठाकरे गटाच्या हालचाली नाही
मुंबई येथे शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून मेळावे आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्याना दोन्ही गट आपले शक्ती प्रदर्शन करत आहे. शिंदे गटाकडून जिल्ह्यातून बसने कार्यकर्ते मुंबईला पाठविण्यात आले आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून जिल्ह्यात कोणत्याही हालचाली दिसत नाहीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.