wardha Crime News
wardha Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Crime News :अबब... दारूबंदी जिल्ह्यात बनावट दारुचा कारखाना; पोलिसांनी धाड टाकत केला पर्दाफाश

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

Wardha Crime News : वर्धा जिल्हा दारुबंदी जिल्हा असतानाही मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने दारूची विक्री केली जाते. जिल्हा पोलीस अधीक्षक नूरूल हसन यांनी अवैध व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. (Latest Marathi News)

आज वर्ध्यालगतच्या (Wardha) सावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये चक्क बनावट दारुचा कारखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी धाड टाकत हा कारखाना पोलिसांनी उद्धवस्त करत लाखोंचा बनावट दारुसाठा जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या क्राईम इंटेलिजन्स पथकाकडून करण्यात आली.

जिल्ह्यातील दारुविक्री बंद व्हावी, यासाठी पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्याकडून सतत प्रयत्न सुरु आहे. इतकेच नव्हे तर दररोज दारुविक्रेत्यांवर कारवाई करीत गुन्हे दाखल करुन दारुसाठा पकडला जातो आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील पोद्दार बगिचा परिसरात सुरु असलेल्या अवैध बारवर कारवाई करण्यात आली.

तोच आज सावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चिंतामणी अपार्टमेंटमध्ये सुरु असलेल्या बनावट दारुचा कारखानाच पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी (Police) लाखो रुपयांचा बनावटी दारुच्या जवळपास एक हजारावर बाटल्या आणि दारुत मिसळविणारे द्रव्य तसेच सील आणि लेबल देखील जप्त केले. पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी घटनास्थळी भेट देत संपूर्ण परिसराची पाहणी केली.

कारवाई दरम्यान पोलिसांना अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. यातील आरोपी विशाल भगत हा चिंतामणी अपार्टमेंटमध्ये राहतो. हा त्याच्याच फ्लॅट समोरील एका बंद फ्लॅटचे दार तोडून त्या फ्लॅटमध्ये बनावट दारु तयार करायचा.

घराच्या गॅलरीमधून दुसऱ्या फ्लॅटमध्ये उडी मारुन त्या फ्लॅटमध्ये दारुच्या बाटल्यांमध्ये बनावट द्रव टाकून ‘ओरिजिनल’ दिसेल अशी दारु तयार करुन त्या बाटल्या बॅगमध्ये भरुन विक्री करायचा. आरोपी विशाल भगत हा सध्या फरार आहे. तो रिकाम्या बाटल्यांमध्ये बनावट दारु तयार करुन बाटल्यांना ‘सील’बंद करुन विकायचा.

तो वर्ध्यात किंवा जिल्ह्यात कुणाला ही दारु विकायचा याचा शोध घेतला जातो आहे. आरोपीला लवकरच अटक करुन ज्याला दारु विकायचा त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी यावेळी दिली.

बनावट दारु निर्मिती करून विक्री करणारा जिल्ह्यात रॅकेट असल्याच पोलिसांना संशय आहे. पोलिसांकडून लवकरच रॅकेटचा भंडाफोड करण्यात येईल अशी माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिलीय.ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कापडे, दिनेश बोथकर, अनुप कावळे, सागर भोसले, राकेश इतवारे, पवन देशमुख, धीरज राठोड, अरविंद इंगोले, अभीषेक नाईक, मंगेश आदे यांनी केली. यावेळी सावंगीचे पोलिस निरीक्षक धनाजी जळक हे देखील उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : निवडणूक आयोगाकडून अजित पवारांना नोटीस, काय आहे प्रकरण?

Breaking News: अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळेंना निवडणूक आयोगाची नोटीस; आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

Social Media मध्ये नेत्यांविषयी आक्षेपार्ह व्हिडिओ केला पोस्ट, दाेन गुन्हे दाखल

Samruddhi Highway Accident: 'समृद्धी'वर अपघातांची मालिका थांबेना! सलग पाचव्या दिवशी भीषण अपघात; ४ जण जखमी

MI vs SRH: टीम इंडियासाठी गुड न्यूज! सूर्यासह संघातील हे स्टार खेळाडू फॉर्ममध्ये परतले

SCROLL FOR NEXT