Wardha Crime News चेतन व्यास
महाराष्ट्र

Wardha: पोलिसाच्याच घरात चोरी; लहान मुलीच्या गळ्याला चाकू लावून मारला डल्ला

Wardha Crime News: अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन लहान मुलीच्या गळ्याला चाकू लावून घरातील सुमारे १ लाख ४२ हजार रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेतन व्यास, वर्धा

वर्धा: वर्धा जिल्ह्यात (Wardha) गुन्हेगारांची मजल वाढली आहे. चोरट्यांनी एका पोलिस कर्मचाऱ्याच्या घरात घुसून दरोडा टाकत दागिने लंपास केले आहेत. एवढंच नाही, तर चोरट्यांनी पोलिसाच्या घरात असलेल्या लहान मुलीच्या गळ्याला चाकू लावत हा गुन्हा (Crime) घडवून आणला आहे. रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी अज्ञात चोरट्याने प्रवेश करुन त्याच्या लहान मुलीच्या गळ्याला चाकू लावून घरातील सुमारे १ लाख ४२ हजार रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला. ही घटना सिंदी मेघे परिसरातील झाडे लेआऊटमध्ये मध्यरात्री घडली. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली. (Wardha Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, पवन छोटेलाल यादव हे रामनगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर आहेत. त्यांची स्टेशन डायरीवर ड्यूटी असल्याने ते सोमवारी ११ वाजता पोलीस ठाण्यात कर्तव्यावर गेले होते. घरात पवन यादव यांची पत्नी पूनम, दोन मुली आणी सासू घरी होते. मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर पूनम यादव यांना आवाज करायचा नाही, ओरडायचे नाही, तुमच्याकडे जे काही पैसे, सोनं असेल ते द्या अशी धमकी दिली. तेवढ्यातच त्याने पवन यादव यांच्या लहान मुलीला उचलून तिच्या गळ्याला चाकू लावला आणि जे घरात आहे ते दे, नाही तर तुझ्या मुलीला मारुन टाकेल अशीही धमकी दिली.

मुलीच्या जीवाच्या भीतीपोटी पूनम यादव यांनी कपाटात ठेवलेले १५ ग्रॅम वजनाचा सोन्याचे दोन हार, सोन्याच्या तीन अंगठ्या, सोन्याची चैन, सोन्याचा झुमका, सोन्याचे कानातले, सोन्याचे मंगळसूत्र, असे एकूण १ लाख ४२ हजार रुपयांचे दागिने काढून दिले.

यानंतर चोरट्याने मुलीला सोडून दागिने बॅगमध्ये भरत दुचाकीने पळ काढला. या घटनेने घाबरलेल्या आणि गोंधळलेल्या अवस्थेत पूनम यादव यांनी घटनेची माहिती पती पवन यादव यांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत. मात्र, पोलिसाच्याच घरी चोरी झाल्याने सामान्य नागरिक काय सुरक्षित राहणार? असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी वाढली, थंडीचा कडाका जाणवणार; पंखे, कुलर, एसी बंद

Maharashtra Politics : भाजपला का हवेत फडणवीसच? संघही अनुकूल, आमदारांचाही पाठिंबा

Mumbai Crime : केमिकलचे स्प्रे मारून कुत्र्याचा डोळा केला निकामी; भांडुपमधील महिलेचं घृणास्पद कृत्य, पोलिसांत गुन्हा

Guru Margi 2025: बृहस्पती 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; सुख-समृद्धीसह-धनसंपत्तीही वाढणार

Maharashtra Politics: EVM विरोधात लढण्याचा पवारांचा निर्धार! आंदोलन उभारण्याचा ठाकरेंचा इशारा

SCROLL FOR NEXT