Wardha Crime Saam Tv
महाराष्ट्र

Wardha Crime : संपत्तीचा वाद विकोपाला, मुलाने काढला वडिलांचा काटा

घोराड येथील धक्कादायक घटना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेतन व्यास, वर्धा

Wardha Crime News : वर्धा येथील धक्कादायक घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरुन गेला आहे. वडिलोपार्जित शेतजमिनीच्या हिस्सेवाटणीच्या कारणातून बाप लेकांमध्ये झालेल्या हाणामारीत वडील गंभीर जखमी झाले होते. ही घटना रविवारी १ रोजी सायंकाळच्या सुमारास घोराड गावात घडली होती. जखमी बापावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू असतानाच आज त्याचा मृत्यू झाला. (Latest Marathi News)

याप्रकरणी सेलू पोलिसांनी मुलाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. कवडू गुळघाने (६५) रा. सावली सास्ताबाद ह.मु. घोराड असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मृतक कवडू यांचे त्यांच्या पत्नीशी वाद असल्याने ते आपल्या आई आणि बहिणीला घेऊन गेल्या २८ वर्षांपासून घोराड गावात वास्तव्यास होते. पत्नीसह मुलगा आणि मुलगी हे तिघे सावली सास्ताबाद येथे राहतात. वडिलोपार्जित शेतजमिनीबाबत मुलगा संजय आणि कवडू यांच्यात वाद सुरू होता.

चार एकर जमीन बहिणीच्या नावे केल्याने संतापलेल्या संजयने घोराड गाठून रविवारी सायंकाळी वडील कवडू यांना जबर मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी कवडू यांना उपचारार्थ सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, बुधवारी उपचारादरम्यान तात्यांचा मृत्यू झाला. कवडूच्या मृत्यूने गावात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी संजय याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Shocking : शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला; अॅमस्टरडॅममध्ये उडाली मोठी खळबळ

Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक समाजात कमावतात नाव; सूर्यदेवाची असते कृपा

Sunday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवा, आर्थिक व्यवहार टाळावे; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार होणार

चिमुकलीचा हात खेळता खेळता लिफ्टच्या दरजावात अडकला; धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, VIDEO

SCROLL FOR NEXT