Central Raiway : मध्य रेल्वेची प्रभावी कामगिरी; गेल्या वर्षातील महसुलात झाली विक्रमी वाढ

मध्य रेल्वेने एप्रिल-डिसेंबर २०२२ मध्‍ये पार्सल महसूलात प्रभावी कामगिरी आणि गैर-भाडे महसुलात सर्व क्षेत्रीय रेल्वेमध्‍ये व्रिकमी वाढ झाली आहे
Central Raiway
Central RaiwaySaam Tv
Published On

रुपाली बडवे

Central Raiway News : मध्य रेल्वेने एप्रिल-डिसेंबर २०२२ मध्‍ये पार्सल महसूलात प्रभावी कामगिरी आणि गैर-भाडे महसुलात सर्व क्षेत्रीय रेल्वेमध्‍ये व्रिकमी वाढ झाली आहे. मध्य रेल्वेने गैर-भाडे महसुलात ₹60.01 कोटी आणि पार्सल महसुलात ₹230.82 कोटी नोंदवले आहे. (Latest Marathi News)

Central Raiway
Pune News: पुण्यात रेल्वे प्रवासाच्या नियमांत बदल?; एक तास आधी पोहचावे लागणार रेल्वेसटेशनवर

गैर-भाडे महसूल

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये (एप्रिल ते डिसेंबर) मध्य रेल्वेची कामगिरी गतवर्षीच्या याच कालावधीतील ₹19.05 कोटींच्या तुलनेत ₹60.01 कोटीच्या विक्रमी महसुलासह प्रभावी ठरली आहे. ज्यामध्ये 215% ची प्रचंड वाढ दिसून आली आहे. सर्व क्षेत्रीय रेल्वेंमध्ये हे सर्वाधिक आहे.

डिसेंबर 2022 मध्ये करण्यात आलेले प्रमुख करार

दिनांक 19.12.2022 रोजी 20 EMU चा समावेश असलेल्या बाह्य विनाइल रॅपिंगसाठी मुंबई विभागाकडून 3 वर्षांसाठी 95.42 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पनासह 4 कंत्राटे.

दिनांक 19.12.2022 रोजी अंतर्गत जाहिरातीसाठी (5 EMUs च्या) मुंबई विभागाकडून एक करार करण्यात आला ज्याचे वार्षिक उत्पन्न ₹35.09 लाख 3 वर्षांसाठी आहे.

Central Raiway
Eknath Shinde : 'धर्मवीर'वरून राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट; मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

रेल डिस्प्ले नेटवर्क- (RDN)

• मुंबई विभागाकडून 12.12.2022 रोजी (5 वर्षांसाठी 4 डिजिटलसह) 6 RDN कॉन्ट्रॅक्ट्स ₹ 27.92 लाख प्रतिवर्षाच्या महसूलासह प्रदान करण्यात आले.

• कलबुर्गी स्टेशनचा एक RDN कॉन्ट्रॅक्ट दि. 14.12.2022 रोजी ₹7.31 लाखांच्या वार्षिक उत्पन्नासह 3 वर्षांसाठी करण्यात आला.

NINFRIS- (नवीन, नाविन्यपूर्ण नॉन-फेअर महसूल कल्पना योजना)

• कामगाव गुड्स शेडमध्ये मालाची संकरित हाताळणी 5 वर्षांसाठी वार्षिक ₹ 3.00 लाख उत्पन्नासह.

नाशिकरोड स्टेशनवर खादी वस्तूंचा प्रचार करण्यासाठी- एक वर्षासाठी परवाना शुल्क रुपये 0.80 लाखासह. लवकरच दोन्ही कामे सुरू होतील.

पार्सल महसूल

मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष 2022-23 (एप्रिल ते डिसेंबर) मध्ये 3.83 लाख टन पार्सल आणि सामानाच्या वाहतुकीद्वारे ₹230.82 कोटींचा महत्त्वपूर्ण महसूल देखील नोंदविला. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये याच कालावधीत, वेळापत्रकानुसार पार्सल ट्रेनच्या 180 फेऱ्यांतून ₹13.06 कोटी उत्पन्न मिळवले आणि 25 इंडेंट पार्सल कार्गो एक्सप्रेस ट्रेनने ₹4.85 कोटी उत्पन्न मिळवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com