Wardha Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Wardha Crime News: वर्ध्यात बनावट ऑनलाईन सेंटरमधून कागदपत्रांचा काळाबाजार, कारवाई केल्यावर उघडकीस आला धक्कादायक प्रकार

Wardha News: वर्ध्यात बनावट ऑनलाईन सेंटरमधून कागदपत्रांचा काळाबाजार, कारवाई केल्यावर उघडकीस आला धक्कादायक प्रकार

साम टिव्ही ब्युरो

>> चेतन व्यास

Wardha Crime News: शासकीय अधिकाऱ्यांच्या डिजीटल स्वाक्षरी असलेले बनावट कागदपत्रं तयार करुन नागरिकांना ते अव्वाच्या सव्वा शुल्क आकारुन देणाऱ्या बनावट व्ही.एस. ऑनलाईन सर्विस सेंटरचा काळाबाजार उजेडात आला. याप्रकरणी महसूल विभागासह पोलिसांच्या चमूने ऑनलाईन सेंटरवर कारवाई करुन चौघांना अटक केली आहे.

बनावट कागदपत्रांसह लॅपटॉप आणि महागडी कार असा एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई प्रशासकीय इमारतीच्या समोरील रस्त्यावर करण्यात आली. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये ऑनलाईन सेंटर चालक विकास कुंभेकर रा. अमरावती याच्यासह त्याची पत्नी आणि दोन ऑपरटेर अशा चौघांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन मुकुंद सुळे रा. बॅचलर रोड वर्धा याने प्रशासकीय इमारतीच्या समोरील रस्त्यालगत असलेल्या व्ही.एस. ऑनलाईन सर्व्हिस सेंटरमधून उत्पन्नाचा दाखला काढला होता. त्याने महाविद्यालयात दाखला दिला असता महाविद्यालयीन प्रशासनाने केलेल्या पडताळणी दरम्यान उत्पन्नाचा दाखला बनावट असल्याचे सांगितल्या गेले. नितीनने ही बाब त्याचे वडिल मुकुंद सुळे यांना सांगितली. त्यांनी तत्काळ याची तक्रार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे केली. जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार रमेश कोळपे यांच्यासह पोलिसांना माहिती देत कारवाई करण्यास सांगितले. त्या आधारे महसूल विभागासह पोलिसांच्या चमूने ऑनलाईन सर्व्हिस सेंटरवर छापा टाकला असता सेंटरमध्ये बनावट उत्पन्नाचा दाखला आणि एक बनावट शपथपत्र मिळून आले. (Latest Marathi News)

तहसीलदार रमेश कोळपे यांनी पंचनामा केला. पोलिसांनी ऑनलाईन सेंटरमधून तीन लॅपटॉप, दोन प्रिंटर, किबोर्ड, बॅटरी इनव्हरटरसह एक चारचाकी असा एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सेंटर चालक विकास कुंभेकरसह त्याची पत्नी आणि दोन संगणक चालकांना अटक केल्याची माहिती दिली.

ही कारवाई तहसीलदार रमेश कोळपे, नायब तहसीलदार बाळू भागवत, अजय धर्माधिकारी, माहिती तंत्रज्ञान शाखेचे प्रकल्प व्यवस्थापक शेहजाद शेख, महाआयटीचे जिल्हा समन्वयक प्रतिक उमाटे यांनी केली. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड यांनी भेट दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील हे करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माझ्या विजयाचं लीड ५ हजारांंपेक्षा जास्त असेल - श्रद्धा जाधव

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT