Wardha Crime News Saamtv
महाराष्ट्र

Wardha Crime News: चोरीची गाडी विकायला आले अन्... वर्ध्यात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चौघांना अटक

Bike stealing gang In Wardha: वर्ध्याच्या दयालनगर परिसरातील रेल्वे प्रवेशद्वारासमोर करण्यात आलेल्या या कारवाईत चौघांना अटक करण्यात आली आहे.

Gangappa Pujari

चेतन व्यास, प्रतिनिधी...

Wardha News: वर्धा शहरासह जिल्ह्यात सध्या दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असतानाच स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून चोरीच्या दुचाकी विकायला येणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला. वर्धेच्या दयालनगर परिसरातील रेल्वे प्रवेशद्वारासमोर करण्यात आलेल्या या कारवाईत चौघांना अटक करण्यात आली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वर्ध्याच्या (Wardha) पुलगाव परिसरात दुचाकी चोरींच्या घटना वाढल्या होत्या. त्यानुसार पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला चोरीतील वाहनांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार चोरट्यांचा आणि दुचाकींचा शोध पोलिसांकडून कसोशीने घेतला जात होता.

याचकाळात पोलिस पथकाला चोरीची दुचाकी विकण्यासाठी दयालनगर परिसरात चोरटे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दयालनगर परिसरात सापळा रचला असता एका दुचाकीवर दोन संशयित व्यक्ती बसलेले दिसून आले.

पोलिसांनी त्यांची विचारपूस केली असता एकाने त्याचे नाव कौशिक तिवारी असल्याचे सांगितले तर दुसरा मुलगा अल्पवयीन होता. त्यांच्याकडे दुचाकीबाबत विचारणा करून पोलिसी खाक्या दाखवताच दुचाकी पुलगाव परिसरातून चोरल्याची कबुली दिली.

पोलिसांनी समांतर तपास करून पुलगाव परिसरातून सात चोरीतील दुचाकी विविध ठिकाणाहून हस्तगत केल्या. तसेच चोरीतील दुचाकी विक्री करण्यासाठी मदत करणाऱ्या राहुल दादाराव जाधव, रा. वडार झोपडपट्टी, गौतम कुंवरलाल मानेश्वर, रा. बोरगाव मेघे यांनाही अटक करण्यात आली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crying Benefits: रडणे आरोग्यासाठी चांगले; जाणून घ्या फायदे

Monsoon Hair Care: पावसात भिजल्यामुळे केसांमध्ये येणारी दुर्गंधी कशी टाळाल? वाचा घरगुती उपाय

Maharashtra Live News Update: - सोलापुरात प्रहार जनशक्ती संघटनेच्यावतीने भीकमांगो आंदोलन

शिंदे गटाला पश्चिम महाराष्ट्रात धक्का; माजी मंत्र्यांच्या बंधूंचा तडकाफडकी राजीनामा; पत्रात सांगितली मनातली खदखद

Home Vastu Tips: घराच्या पायऱ्यांखाली कोणत्या वस्तू ठेवू नयेत? त्रास होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT