Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News : बांधकामावरून आई व मुलाला मारहाण; वडनेर पोलिसांत १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Wardha News : बांधकामावर ग्रामपंचायतीतील एक अधिकारी आले त्यांनी पाहणी करून संपूर्ण घराचे कागदपत्रे तपासून तेथून निघून गेले

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर या गावात बांधकामावरून एका महिलेचा आणि गावकाऱ्यांसोबत वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत होऊन महिलेला व तिच्या मुलाला मारहाण केल्याची घटना समोर आली. ही घटना कॅमेरात कैद झाली आहे.

हिंगणघाट तालुक्यातील (Wardha) शेकापूर गावातील रहिवासी अनंता बोबडे हे बांधकामात अडथळा निर्माण करतात. बांधकामावर ग्रामपंचायतीतील एक अधिकारी आले त्यांनी पाहणी करून संपूर्ण घराचे कागदपत्रे तपासून तेथून निघून गेले. त्या दरम्यान गावकाऱ्यांसोबत बांधकामावरून वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले आहे. गावकऱ्यांनी मारहाणीचे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले आहे. (Crime News) वैशाली मुजबैले यांना कॉलमच्या खड्ड्यात पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचं बोललं जातं आहे. 

वैशाली यांचा मुलगा मोबाइलमध्ये चित्रण करीत असताना त्याच्या हातून मोबाइल हिसकावत फोडला. वैशालीचे पती वाद सोडविण्यास गेले असता त्यांनाही मारहाण केल्याची माहिती सांगण्यात आली आहे. याप्रकरणी वडनेर (Police) पोलिसांत दोन्ही गटांच्या लोकांच्या तक्रारीवरून १७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lock Upp 2: 'लॉक अप २'मधून सुनीता आहुजाची एक्झिट; पत्नीला घेण्यासाठी सेटवर पोहोचला गोविंदा

Shocking : रेशनकार्ड बनवून देतो पण..., तहसीलदार ऑफिसजवळ बोलावून ३० वर्षीय महिलेकडे शरीर सुखाची मागणी

Skin Care Tips : हे पदार्थ खाल्ल्याने ७ दिवसातच चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो

वारी म्हणजे काय? महाराष्ट्रात वारी कधीपासून सुरू झाली?| Pandharpur Wari 2026

Kidney Health: किडनी अटॅकचा धोका टाळायचाय? लगेचच आहारात घ्या या ७ गोष्टींचा समावेश

SCROLL FOR NEXT