वर्धा : दारूच्या नशेत आपण काय करतो याचं कुणालाही भान राहत नाही. अनेकदा दारू पिऊन मद्यपी भररस्त्यात धिंगाणा घालतात. असाच काहीसा प्रकार वर्धा जिल्ह्यातूनही समोर आला आहे. वर्ध्याच्या बॅचलर रोडवर रविवारी रात्री मद्यपीने चांगलाच धिंगाणा घातला. हा मद्यपी रस्त्याने शिवीगाळ करत चालला होता. तो एवढ्यावरच थांबला नाही तर रस्त्यावरून जात असलेल्या गाड्या अडवण्यास सुरूवात केली. या मद्यपीचा धिंगाणा वाढत असल्याने तेथील नागरिक संतप्त झाले आणि त्याला चांगलाच चोप दिला. नागरिकांनी या मद्यपीची झिंग उतरवून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. (Wardha Latest Marathi News)
अरुण शेलार असं या मद्यपीचं नाव असून तो जालना जिल्ह्यातील रहिवासी असून मानसिक रुग्ण असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिववैभव मंगल कार्यालयाजवळ रस्त्याच्या कडेला एका महिलेची कार उभी होती. तेवढ्यातच अरुण शेलार हा मद्यपी तेथून जात होता. कारला बघताच त्याने धिंगाणा घालण्यास सुरूवात केली. इतकंच नाही तर, त्याने कारला लाथ मारत काच फोडायला सुरवात केली.
ही बाब रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या इतर नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी या मद्यपीला समजूत घालून तेथून जाण्याचा सल्ला दिला. मात्र हा मद्यपी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. नागरिकांना बघून त्याने आणखीच कारच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला. परिसरातील काही नागरिकांनी या घटनेचे चित्रिकरण देखील केले. काही वेळेत परिसरातून जाणारे नागरिक जमले आणि त्याला चांगलाच चोप देत पोलिसांना माहिती दिली.
दारुच्या नशेत टुल्ल झालेल्या या मद्यपीची नागरिकांनी चांगलीच धुलाई केली. दरम्यान, मद्यपीची नशा उतरवल्यानंतर तो काही प्रमाणात मानसिक रुग्ण असल्याचं नागरिकांना कळालं. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं. रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या कारला अडविणारा तसेच काचा फोडणारा हा मद्यपी वेडसर असावा असा अंदाज पोलिसांना आहे. पण, तो खरोखरच आहे की वेडेपणाचं सोंग घेत होता याचा तपास आता पोलीस करत आहेत.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.