प्रेमविवाह केलेल्या दांपत्याच्या प्रेमाला संशयाची बाधा; पतीने केली पत्नीची हत्या! SaamTvNews
महाराष्ट्र

प्रेमविवाह केलेल्या दांपत्याच्या प्रेमाला संशयाची लागण; पतीने केली पत्नीची हत्या!

इम्रान जलालुद्दीन खान याने पत्नीला दगडाने ठेचून जिवानिशी ठार केले

सुरेंद्र रामटेके, साम टीव्ही, वर्धा

वर्धा : प्रेमविवाह केलेल्या दांपत्याच्या प्रेमाला संशयाची बाधा झाली आणि त्यातून दुर्दैवी घटना घडली. वर्ध्यातील (Wardha) भुगाव रोडवरील लॉईडस स्टील कंपनी परिसरात चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Wardha Bhugaon Road Murder Latest News)

हे देखील पहा :

चारित्र्याच्या संशयावरून या पती-पत्नीमध्ये नेहमीच वाद व्हायचा. मात्र, आज या वादाने अचानक उग्ररूप धारण केले. घरात चाललेला वाद अंगणात पोहोचला आणि बघता बघता इम्रान जलालुद्दीन खान (वय 25) याने आपली पत्नी कैकशा इम्रान खान (वय 20) हिला दगडाने ठेचून जिवानिशी ठार (Murder) केले. हि घटना संध्याकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच तात्काळ सावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस (Police) निरीक्षक धनाजी जळक आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. मृतकाचे शव पोस्टमार्टम साठी सामान्य रुग्णालय वर्धा येथे पाठविण्यात आले असून आरोपी इम्रान खान याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ शिवसेनेकडून व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

SCROLL FOR NEXT