Locals gather at the crime scene in Arvi, Wardha after a 5-year-old girl was rescued and the accused was detained. Saam tv
महाराष्ट्र

पाशवी कृत्य! शौचालयाला जाणाऱ्या ५ वर्षाच्या मुलीवर ४५ वर्षाच्या नराधमाचा बलात्कार; महाराष्ट्र संतापला

Justice Demanded for Wardha Minor: वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे ५ वर्षांच्या चिमुरडीवर ४५ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Omkar Sonawane

चेतन व्यास, साम टीव्ही

वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे मानवतेला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. पाच वर्षीय निष्पाप बालिकेवर अत्याचारच्या प्रयत्नाची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. शौचास गेलेली बालिका बराच वेळ परत न आल्याने परिसरातील नागरिकांनी तिचा शोध सुरू केला आणि ती बालिका आरोपीच्या ताब्यात आढळून आली.

ज्यामुळे संतप्त नागरिकांनी तात्काळ आरोपीला पकडत त्याला चोप दिला. यानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती देत आरोपीला त्यांच्या ताब्यात दिले. गंगाधर धुर्वे वय 45 वर्षे असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक करून पोस्को सह विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली. दरम्यान जखमी बालिकेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

या घटनेतील आरोपी गंगाधर धुर्वे हा आर्वीच्या पारगोठाण येथील रहिवासी आहे. त्याच्या विक्षिप्त स्वभावामुळे त्याची पत्नी, मुले त्याला सोडून गेले आहे. सध्या तो ट्रकवर क्लीनरचे काम करून कुठेही राहतो आणि कुठेही झोपतो, त्याला घरदार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ज्या बापाने बोट धरून चालायला शिकवलं, त्याच्याच अंत्यविधीसाठी मुलाला वेळ नाही; महाराष्ट्रात मन हेलावून टाकणारी घटना

5 Things You Should Never Give to Others: या 5 गोष्टी चुकूनही दुसऱ्याला देऊ नका

Maharashtra News Live Update: पवई IIT च्या गेटवर युवक काँग्रेसकडून आंदोलन

5 Gram Gold Mangalsutra: 5 ग्रॅम सोन्यामध्ये महिलांसाठी सुंदर मंगळसूत्र; पाहा लेटेस्ट 5 डिझाइन्स

मुंबईच्या ५ स्टार हॉटेलमध्ये जेवायला गेले अन् ताटात काय दिसलं? प्रसिद्ध डॉक्टरांचा थेट तुकाराम मुंढेंकडे संताप

SCROLL FOR NEXT