Wardha Nagpur Mumbai Road Accident News:  Saamtv
महाराष्ट्र

Wardha Accident News: वर्ध्यात भयंकर अपघात! भरधाव ट्रकने रिक्षाला उडवलं; ४ जण ठार, ३ गंभीर, चालक फरार

Gangappa Pujari

चेतन व्यास, वर्धा|ता. ५ ऑगस्ट २०२४

वर्ध्यामधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. नागपूर मुंबई महामार्गावर अज्ञात ट्रकने रिक्षाला धडक दिल्याने ही मोठी दुर्घटना घडली. यामध्ये दोघेजण जागीच ठार झाले तर उपचारादम्यान दोघांचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरुन फरार झाला असून पोलीस शोध घेत आहेत.

राज्यामध्ये भीषण अपघातांचे सत्र काही थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. आज वर्ध्यामधील नागपूर मुंबई महामार्गावर ट्रक आणि रिक्षामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चौघांचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झालेत. अज्ञात ट्रकने रिक्षाला धडक दिल्याने ही भयंकर घटना घडली असून अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, नागपूर मुंबई महामार्गावरुन ऑटो ही पुलगावकडे जात होती. ज्यामध्ये आठवडी बाजाराला जाण्यासाठी सात जण प्रवास करत होते. तर धडक दिलेला ट्रक विरुद्ध दिशेने येत होता. यावेळी केळापूर शिवारात भरधाव ट्रकने रिक्षाला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. यामध्ये दुर्गाबाई मसराम व सतीश नेहारे या दोघांचा जागीच अंत झाला.

याबाबतची माहिती मिळताच केळापूर येथील पोलीस पाटील रोशन भोवटे व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. ऑटोचालक सागर मराठे, सुमित्रा कौराती, भीमराव पाटील यांच्यासह आणखी दोन जण यामध्ये जखमी झाले होते. यांपैकी भीमराव पाटील व सुनीता कौराती यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

आता अपचार सुरू असलेल्या तिघांची जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला असून पुलगाव पोलीस अधिक तपास करत आहेत. या दुर्दैवी घटनेने केळापूर गावावर शोककळा पसरली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT