Wardha Accident Saam Tv
महाराष्ट्र

Wardha Accident News : शेडगाव पाटीनजीक ट्रक्टरला अपघात; मांडगावतील एक ठार, एकजण गंभीर जखमी

समुद्रपूर तालुक्याच्या शेडगाव पाटीजवळील घटना

Shivani Tichkule

चेतन व्यास

Wardha Accident News : समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव पाटीजवळ सिमेंट पोल भरलेला ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन दुभाजकाला धडकून पलटी झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेला दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला. मृतकाचे नाव कुणाल बावणे रा. मांडगाव असे आहे.   (Latest Marathi News)

मांडगाव येथील अंकित दांडेकर यांच्या मालकीचा ट्रॅक्टर हा चालक कुणाल नानाजी बावणे व सोबत एका व्यक्तीला घेऊन ट्रॅक्टरमध्ये इलेक्ट्रिक सिमेंट पोल घेऊन खंडाळ्याला जात होता. दरम्यान, शेडगाव पाटीजवळ अचानक चालकाचे वाहनावरुन नियंत्रण सुटल्याने वाहन अनियंत्रित होऊन दुभाजकावर चढले. त्यामध्ये ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातात ट्रॅक्टर

चालक कुणाल नानाजी बावणे रा. मांडगाव याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात (Accident) एक जण जखमी झाला. जखमीला उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे दोन्ही बाजूने ५ ते ६ किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्याने दोन्ही कडील वाहतूक दोन तास खोळंबली होती. यावेळी महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राचे प्रभारी सपाटे यांनी व सहकाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली. या घटनेची समुद्रपूर सुरळीत केली. पोलीस (Police) ठाण्यात नोंद करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New District: राज्यात नव्या जिल्ह्याची निर्मिती; हरियाणा सरकारचा मोठा निर्णय

Methi Usal Recipe: झणझणीत मेथी उसळ कशी बनवायची? वाचा गावरान रेसिपी

मध्यरात्री रक्तरंजित थरार! २ सख्ख्या भावांवर अंदाधुंद गोळीबार, जागीच सोडले प्राण

Ranapati Shivray: दिग्पाल लांजेकरांच्या 'श्री शिवराज अष्टक'मधील सहावे पुष्प भेटीला; 'रणपति शिवराय स्वारी आग्रा'चा टिझर प्रदर्शित

Ankita Lokhande Dance Video: 'मैं तो अपने साजन के द्वार चली रे...' अभिनेत्री अंकिता लोखंडेने केला भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT