WARDHA ACCIDENT CAR CRASHES INTO CONTAINER AFTER BREAKING DIVIDER, 2 DEAD AND 3 INJURED 
महाराष्ट्र

Wardha Accident: कार डिव्हायडर तोडून दुसऱ्या बाजूला कंटेनरला धडकली, २ जणांचा मृत्यू, ३ जण गंभीर जखमी

Maharashtra News: वर्ध्यात भीषण अपघात झाला. कारने डिव्हायडर तोडून समोरच्या बाजूला जाऊन कंटेनरला धडक दिली. या अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले.

Dhanshri Shintre

वर्धा-नागपूर महामार्गावर दत्तपूर शिवारातील द इव्हेंट मंगल कार्यालयाजवळ शुक्रवारी रात्री एक भीषण अपघात झाला. अनियंत्रित झालेल्या कारने दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या कंटेनरला धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरवरून वर्ध्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेली कार (क्रमांक MH32AS8938) अचानक डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेने गेली. त्याच वेळी वर्ध्याकडून नागपूरच्या दिशेने येणारा कंटेनर (क्रमांक NL01AG0988) जोरात आला आणि कारला समोरून जोरदार धडक दिली. भीषण अपघातात ८५ वर्षीय कमल शंकरसिंग ठाकूर आणि ४५ वर्षीय गजानन तिडके (दोघेही वर्ध्याच्या मालगुजारीपुरा परिसरातील रहिवासी) यांचा मृत्यू झाला. कारचालक अवंतिका ठाकूर (२१ वर्षे), अनुप्रिया ठाकूर (४८ वर्षे) आणि दीपक हे तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आचार्य विनोबा भावे सावंगी मेघे रुग्णालय येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच सेवाग्राम पोलिस आणि महामार्ग पोलिस जाम केंद्रातील पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी अपघातग्रस्त कार टोईंग वाहनाच्या साहाय्याने आणि धडकलेला कंटेनर क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या कडेला सुरक्षित ठिकाणी हलवले. त्यामुळे काही वेळातच महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. अपघातातील कंटेनर चालक मात्र अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

घटनेची माहिती मिळताच सेवाग्राम पोलिस आणि महामार्ग पोलिस जाम केंद्रातील पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी अपघातग्रस्त कार टोईंग वाहनाच्या साहाय्याने आणि धडकलेला कंटेनर क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या कडेला सुरक्षित ठिकाणी हलवले. त्यामुळे काही वेळातच महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. अपघातातील कंटेनर चालक मात्र अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

माहितीनुसार, ही दुर्घटना शुक्रवार, २६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७:४० वाजता घडली. अपघाताचे कामकाज रात्री १०:३० पर्यंत पूर्ण झाले असून या प्रकरणी प्राणांतिक अहवाल सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mega Block : ऐन नवरात्रौत्सवात प्रवाशांचे हाल! रविवारी 'या' मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे, कसा? पाहा वेळापत्रक

Hair Care : महागड्या केमिकलचा वापर टाळा; लावा 'हा' घरगुती हेअर मास्क, पांढरे केस होतील गायब

Maharashtra Live News Update: सांगली , कोल्हापूरप्रमाणे माढा तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवी मदत - सदाभाऊ खोत

Shani Shingnapur Trust Fraud: शनीच्या नावाखाली 100 कोटींचा घोटाळा! अखेर शनिशिंगणापूर देवस्थानचं कार्यालय सील

डोंबिवलीत तरूणानं ११ व्या मजल्यावरून मारली उडी; आधी लोंबकळत होता नंतर.. आत्महत्या की घातपात?

SCROLL FOR NEXT