वानखेडेंनी प्रायव्हेट आर्मी चालवून दहशत निर्माण केली : नवाब मलिक  सुशांत सावंत
महाराष्ट्र

वानखेडेंनी प्रायव्हेट आर्मी चालवून दहशत निर्माण केली : नवाब मलिक

क्रुझवर ड्रग्जची रेव्ह पार्टी झाली आणि त्यात एका रेस्टॉरंटमधून जे जेवण गेलं त्यातूनच ड्रग्ज गेलं होतं ते सगळे पुरावे समोर आणणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- सुशांत सावंत

गोंदिया : शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी न घेता समीर वानखेडे याने प्रायव्हेट आर्मी तयार करुन दहशत निर्माण केली होती हे भविष्यात सिध्द करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, क्रुझवर ड्रग्जची रेव्ह पार्टी झाली आणि त्या पार्टीमध्ये एका रेस्टॉरंटमधून जे जेवण गेलं त्यातूनच ड्रग्ज गेलं होतं ते सगळे पुरावे समोर आणणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.

हे देखील पहा :

एनसीबीच्या डीजींकडे माझ्याकडे असलेले रितसर पुरावे पाठवणार आहे. इलेक्ट्रॉनिक मुद्देमाल त्यांच्या कार्यालयातील आहेत. जागेवर जाऊन मुद्देमाल जप्त केला जात नाही. कार्यालयात आणून हे सर्व केलं जातंय. एका कोर्‍या कागदावर सह्या घेतल्या जात आहेत. समीर वानखेडे याने एक प्रायव्हेट आर्मी तयार केली असून त्यामध्ये प्लेचर पटेल, आदिल उस्मानी, के. पी. गोसावी, मनीष भानुशाली यासारखे अनेक लोक आहेत.

हे सर्व घरात घुसून ड्रग्ज ठेवत आहेत आणि लोकांना अडकवत आहेत हे सगळं फर्जीवाडा असून याची संपूर्ण माहिती काढली असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. कालच फर्निचरवाला नावाच्या मुलीने तिच्या बहिणीला कसं अडकवलं त्यावेळी प्लेचर पटेल उपस्थित होता हे सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा आणखी मोठा उलगडा होईल असेही नवाब मलिक म्हणाले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: मध्यरात्री अपघाताचा थरार, भरधाव कार वरातीमध्ये घुसली; तिघांचा जागीच मृत्यू, १६ गंभीर

Aloe Vera For Skin Benefits: हिवाळ्यात चेहऱ्याला लावा कोरफड, त्वचा दिसेल एकदम फ्रेश

Pati Patni Aur Panga: 'या' कपलने जिंकली ‘पती पत्नी और पंगा’ची ट्रॉफी; दुसऱ्या क्रमांकावर कोण? घ्या जाणून…

Maharashtra Live News Update: बिबट्यांच्या नसबंदीसाठी परवानगी मिळाली- वनमंत्री गणेश नाईक

Peanut Recipe: मुलं डब्यातल्या भाज्या खाऊन कंटाळलेत? मग शेंगदाण्याच्या या २ भन्नाट रेसिपी ट्राय करा

SCROLL FOR NEXT