Family members of Mahadev Munde allege threat to life after his son was assaulted in Parli. Saam Tv
महाराष्ट्र

थेट मुंडेंच्या मुलाला मारहाण, बीडमध्ये पुन्हा वाल्मिक कराड समर्थकांची दहशत वाढली

Walmik Karad Supporters Assault Mahadev Munde Son In Parli: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये असला तरी कराडच्या समर्थकांचे कारनामे अद्याप थांबलेले नाहीय..परळीत महादेव मुंडेंच्या मुलाला कराड समर्थकांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. मुंडे कुटुंबियांनी काय आरोप केलेत? पाहूयात

Suprim Maskar

परळीतील व्यापारी महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणाला दोन वर्ष उलटून गेलेत. मात्र आरोपी अद्याप मोकाट आहेत. अशातच मुंडे कुटुंबाची होणारी फरपट अजूनही थांबलेली नाही..या प्रकरणाचा तपास आता निर्णायक वळणावर असतानाच दिवंगत महादेव मुंडेंच्या मुलाला शिकवणीवरून घरी येताना भरचौकात मारहाण झाली. कराड समर्थकांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप मुंडे कुटुंबियांनी केलाय..

महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून सुरु आहे. संशयित आरोपींची नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग झाली आहे. मुंडे कुटुंबियांनी जबाबात वाल्मिक कराडच्या मुलाचं नाव घेतलं आहे. वाल्मिक कराडसह त्याच्या मुलांपासून जीवाला धोका आहे, अशी तक्रार महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी पोलिस अधिक्षकांना दिलेल्या पत्रातून केली आहे. मारहाण करणारा बालाजी आघाव हा वाल्मीक कराडचा समर्थक असल्याचा आरोप केलाय...

पत्रात नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात...

सुशिल वाल्मिक कराड आणि श्रीगणेश वाल्मिक कराडसह त्यांच्या टोळीपासून माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवितास धोका निर्माण झालाय...माझ्या कुटुंबातील लोकांसोबत काही अनपेक्षित घडल्यास किंवा त्यांना धमकी, ब्लॅकमेल, मारहाण करण्यात आल्यास कराडची दोन्ही मुलं जबाबदार असतील.. निवेदनाची गांभीर्यानं दखल घेऊन त्यांच्यावर योग्य कारवाई करावी..

दरम्यान मारहाणीच्या घटनेनंतर परळी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केलाय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील कायदा-सुव्यवस्थेवर सगळ्यांनीच बोट ठेवंल होतं. मात्र कराड गँग जेलमध्ये असली तरी तिचे कारनामे सुरुच असल्यानं पोलिसांसमोर गुंडगिरी मोडून काढण्याचं मोठं आव्हान आहे.

महादेव मुंडेंच्या मुलाला मारहाण करण्यात आल्यानंतर मुंडे कुटुंब सध्या प्रचंड दहशतीखाली आहे. मोठ्या दबावानंतर दोन वर्षानंतर हत्येच्या तपासाला वेग आला असतानाच मारहाणीची घटना घडणं, हे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. मुंडे कुटुंब सुरक्षित राहणार का? आणि या कुटुंबाला न्याय कधी मिळणार ? हाच खरा सवाल आहे.))

योगेश काशिद, साम टिव्ही न्यूज, बीड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआनं सरकारला पाठवलं 15 प्रश्नांचं पत्र; उत्तर देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी काढल्या शुद्धलेखनाच्या चुका

चड्डी बनियान गँग, त्यांनी त्यांची अब्रू वेशीला टांगलीय; एकनाथ शिंदे का भडकले? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील दाजीपूर फोंडा घाट परिसरात तुफान पाऊस

लाडकी बहीण योजना, अजितदादांची आठवण, महाराष्ट्राचा विकास; अधिवेशनच्या पूर्वसंध्येला सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

मुख्यमंत्री बदलणार? आमदार एकवटले म्हणाले आम्हाला बदल पाहिजे; 26 फेब्रुवारीला हायकमांड दिल्लीत निर्णय देणार

SCROLL FOR NEXT