Walmik Karad News SaamTv
महाराष्ट्र

Walmik Karad : आकाला हवाय जेलमध्ये पीए; वाल्मिक कराडकडून 'स्लीप अॅपनिया' आजाराचं कारण, VIDEO

Walmik Karad News : बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड सीआयडीच्या जेलमध्ये आहे... मात्र आता वाल्मिक कराडने स्पेशल ट्रिटमेंटची मागणी केलीय.. कराडची ही मागणी नेमकी काय आहे? कराडने दावा केलेला स्लीप एप्निया आजार काय आहे? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

Saam Tv

भरत मोहळकर, साम टीव्ही

सरपंच संतोष देशमुख हत्येशी संबंधित असलेल्या खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड सीआयडीच्या अटकेत आहे.. मात्र याच बीडच्या आकाने जेलमध्ये स्पेशल ट्रिटमेंटसाठी खासगी पीए सोबत देण्याची मागणी कोर्टाकडे केलीय.. त्यासाठी स्लीप एप्निया या आजाराचं कारण दिलंय...मात्र कोर्टाने तुरुंगातील व्यक्तीसोबत खासगी व्यक्ती ठेवता येणार नसल्याचं स्पष्ट करत वाल्मिक कराडची मागणी फेटाळून लावलीय...मात्र कराडने दावा केलेला स्लीप एप्निया हा आजार नेमका काय आहे? पाहूयात....

'स्लीप एपनिया' आजार नेमका काय?

झोपेत असताना श्वासोच्छवासात अडथळे येणे किंवा गुदमरल्यासारखे वाटणे

झोपताना घाम येणे आणि छातीत दुखणे

झोपताना जोरात घोरणे, अस्वस्थ वाटणे

जास्त वजनानं ग्रस्त असलेल्यांना जास्त धोका

मानेचा आकार 17 इंचांपेक्षा जास्त असणाऱ्यांना धोका

हे असं असलं तरी तज्ज्ञांनी मात्र स्लीप एप्निया असलेल्या रुग्णासोबत 24 तास मतदनीस असण्याची आवश्यकता नसल्याचं स्पष्ट केलंय..

वाल्मिक कराडने सीआयडीपुढे शरणागती पत्करल्यानंतर कोर्टाने कराडला 15 दिवसांची कोठडी सुनावलीय... तर कराडकडून दररोज नवनव्या मागण्या केल्या जात आहेत.. मात्र स्पेशल ट्रिटमेंटची मागणी कोर्टाने फेटाळली असली तरी शासकीय व्यक्तीकडून सुविधा देण्याचे आदेश दिलेत.त्यामुळे कराडला आधीपासूनच पोलीस मदत करत असल्याची शंका उपस्थित केली जात असताना कोर्टाने शासकीय व्यक्तीची मदत देण्याचे निर्देश दिल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

SCROLL FOR NEXT