Crime : वाईत एकावर भर दिवसा तलवारीने हल्ला; जखमी व्यक्तीची बोटे तुटली ओंकार कदम
महाराष्ट्र

Crime : वाईत एकावर भर दिवसा तलवारीने हल्ला; जखमी व्यक्तीची बोटे तुटली

वाई येथील महागणपती घाटावर एका आरोपीने परप्रांतीय तरुणावर दोन्ही हातात तलवारी घेऊन, ठार मारण्याच्या उद्देशाने तलवार हल्ला करून गंभीर जखमी केले.

ओंकार कदम

सातारा : वाई येथील महागणपती घाटावर एका आरोपीने परप्रांतीय तरुणावर दोन्ही हातात तलवारी घेऊन, ठार मारण्याच्या उद्देशाने तलवार हल्ला करून गंभीर जखमी केले. तसेच शहरातील सहा मद्य विक्रीच्या दुकानात तोडफोड करून दहशतीने दुकाने बंद केल्याचा प्रयत्न केला आहे.

हे देखील पहा :

या प्रकरणी आरोपी अजय गोपी घाडगे यास पोलिसांनी अटक केली आहे. भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास अजय गोपी घाडगे याने दोन्ही हातात तलवारी घेऊन शहरातील मध्यवस्तीतील मद्यविक्रीच्या दुकानात जाऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. दुकान चालकांना दमदाटी करून तोडफोड करत दुकाने बंद करण्यास भाग पाडले.

यानंतर घाडगे याने शहरातील महागणपती घाटावर पाणीपुरीची हातगाडी चालवणाऱ्या परप्रांतीय तरुणावर हातातील तलवारीने ठार मारण्याच्या उद्देशाने वार केला. त्या तरुणाने वार चुकवण्यासाठी हात समोर धरल्याने, झालेल्या झटापटीत पान टपरी चालकाची बोटे तुटली.या झटापटीत तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अचानक भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्ही शांत आहोत, याचा गैरसमज आम्ही #@$ डू नाही - राज ठाकरे

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT