Discarded voter ID, Aadhaar and PAN cards recovered from a garbage dump in Jalna ahead of municipal elections. Saam Tv
महाराष्ट्र

खळबळ! निवडणूक मतदान तोंडावर अन् कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळले मतदान ओळखपत्र, आधार-पॅनकार्ड

Voter Id Aadhaar Pan Card Found In Garbage Before Election: जालना शहरात मतदानाला काही तास शिल्लक असताना कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मतदान ओळखपत्र, आधार व पॅन कार्ड सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

राज्यात 29 महापालिकेची धामधूम सुरू असून मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना रविवारी जालना शहरातील सिंधी बाजार परिसरात असलेल्या सावरकर चौकात एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात 24 आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान ओळखपत्र सापडल्याने मोठी खळबळ माजली आहे.

मिळालेल्या महितीनुसार, सावरकर चौकात 17 आधार कार्ड, तीन पॅनकार्ड आणि चार मतदान कार्ड आढळून आल्याची तक्रार प्राप्त झाली होती. याची तात्काळ दखल घेत अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम यांनी निवडणूक पथकाला पाठवत सदर प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे.

डी एन हिवराळे हे निवडणूक भरारी पथकाचे प्रमुख असून त्यांनी घटनास्थळी भेट दिली. प्राथमिक तपासात ही सर्व कागदपत्र बोगस नसल्याचे आढळून आले. यामध्ये कुठलीही प्रत झेरॉक्स कॉपी नव्हती. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हिवराळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. भारतीय दंड न्यायसंहिता कलमा अंतर्गत कलम 223, 123 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल म्हणाले की, निवडणुकीशी संबंधित कागदपत्रे आणि मतदार ओलखपत्रांचा असा निष्काळजीपणा हा मोठा गुन्हा आहे. ऐन निवडणुकी दरम्यान असा प्रकार घडल्याने या घटनेची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. अशा प्रकारामुळे निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो.

तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि आम्ही याचा बारकाईने तपास करणार असल्याचे जालना शहराचे पोलीस आधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितले. जालनाच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी देखील प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्या म्हणाल्या, निवडणूक आयोगाची यंत्रणा आम्ही सुरू केली आहे जी अशा घटनांची गंभीर दखल घेत असते आणि 24 तासात आलेल्या तक्रारींचे निवारण करतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आदित्य आणि राज ठाकरेंची भेट, नेमकी काय चर्चा झाली? VIDEO

बदलापुरात मोठा राडा; भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, कार्यालयही फोडलं, VIDEO

राजकारणातील मोठी घडामोड; शिंदे गटाची प्रकाश आंबेडकरांकडे मदतीसाठी हाक, नेमकं काय घडलं?

हातातला नायलॉन मांजा गळ्यापर्यंत! दोर पतंगाची कापायची की आयुष्याची?

डोंबिवलीत 'महायुती'त रक्ताचा सडा, पैसे वाटपावरून भाजप- शिंदेसेनेत राडा

SCROLL FOR NEXT