latur crime news saam tv
महाराष्ट्र

Latur: पुण्याहून लातूरला परीक्षेसाठी आलेल्या मुलीवर अत्याचार; एक अटकेत

विवेकानंद चौक पोलिसांत संबंधित संशयित आराेपी विरुद्ध तक्रार दिली.

दीपक क्षीरसागर

लातूर : पुणे (pune) येथे वास्तव्यास असणाऱ्या एका कुटूंबातील युवती लातूरात (latur) शिक्षण (education) घेत होती. महिनाभरापूर्वी ती पुण्याहून लातूरला परिक्षेसाठी आली. यावेळी ती तिच्या आत्याच्या घरी मुक्कामी होती. या काळात आत्याच्या पतीने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असून संशयित आराेपीस अटक करण्यात आली आहे. (latur latest marathi news)

विवेकानंद चौक पोलीसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित मूलगी इयत्ता १२ वीची परिक्षा देण्यासाठी लातूर येथे तिच्या आत्याच्या घरी आली हाेती. १२ फेब्रुवारीस संबंधित मुलगी मध्यरात्री झोपेत असताना तिच्यावर अत्याच्या पतीने अत्याचाराचा प्रयत्न केला. परंतु पिडीत मुलीने विरोध केल्यामुळे त्याने तिची माफी मागितली. त्यानंतर ३ मार्चला दुपारी अडीचला ती घरात एकटी असताना त्याने तिच्यावर अत्याचार केला.

या घटनेनंतर मुलगी पुणे येथे गेली. तिने आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आईने तिच्यासमवेत लातूर येथे मंगळवारी विवेकानंद चौक पोलिसांत संबंधित संशयित आराेपी विरुद्ध तक्रार दिली. त्यानूसार त्याला अटक करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची तिसरी माळ; तुळजापुरात भाविकांची मांदियाळी

Mint-Lemon Juice For Liver Health: लिव्हरच्या आरोग्यासाठी बेस्ट ड्रिंक, आठवड्यातून 2 वेळा प्यायल्यास होईल फायदा

Shardiya Navratri 2026 : यंदाच्या नवरात्रीत अष्टमी-नवमी कधी आहे? तिथीमुळे कन्फ्यूजन वाढलंय? जाणून घ्या शुभ मुहूर्त

भाजप आमदारालाच गंडा घालण्याचा प्रयत्न! SBI मध्ये नोकरीचं आमिष, नेमकं प्रकरण काय?

कोकणात उष्णतेची लाट! रत्नागिरीत 'ऑक्टोबर हिट'चा तडाखा, १४३ वर्षांतील विक्रमी तापमानाची नोंद

SCROLL FOR NEXT