Ashadhi Wari 2021 विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नयनरम्य फुलांची आरास भारत नागणे
महाराष्ट्र

Ashadhi Wari 2021 विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नयनरम्य फुलांची आरास

विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नयनरम्य फुलांची आरास

भारत नागणे

पंढरपूर : आषाढी एकादशी निमित्ताने आज विठ्ठल रुक्मिणी मंदिरात Vitthal Rukmini Temple ‌विविध प्रकारच्या देशी‌- विदेशी फुलांनी flowers सजावट केली आहे. पुणे Pune येथील भाविक भारत भुजबळ यांनी ही सजावटीची सेवा‌ केली आहे. देवाचा गाभारा, प्रवेशद्वार, सोळखांबी, सभामंडप आणि संत नामदेव पायरी आदी ठिकाणी फुलांची सजावट केली आहे. Vitthal Rukmini Temple Pandharpurdvj97

हे देखील पहा-

आषाढ देवशयनी एकादशी साजरी केली जात आहे. गाभाऱ्यात फुलांची आरास केल्याने, विठ्ठलाच्या या रुपाला पाहून मन अगदी प्रसन्न झाल्याचे वातावरण मंदिरात तयार झाले आहे. गुलाब, झेंडू, मोगरा, जरबेरा, ऑर्किड, गुलछडी यासह अन्य २१ प्रकारच्या फुलांनी देवाचा गाभारा आणि मंदिर सजवले आहे. यासाठी सुमारे ५ टन फुलांचा‌ वापर केला आहे. फुलांच्या सजावटीमुळे देवाचे रुप अधिकच खुलून दिसत आहे.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने देवाला आज मोती रंगाचा अंगरखा आणि गुलाबी रंगाचे सोवळे असा खास रेश्मी महावस्त्राचा पोशाख परिधान केला आहे. रुक्मिणी मातेला ही‌ गुलाबी रंगाची नववारी साडी परिधान केली आहे. कोरोनामुळे Corona विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद आहे. प्रतिकात्मक पध्दतीने मुख्यमंत्री CM उध्दव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या ‌हस्ते कोरोनाचे सर्व नियम पाळून महापूजा संपन्न झाली आहे. Vitthal Rukmini Temple Pandharpurdvj97

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dasara Melava: बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होणार? दसरा मेळाव्यात राज-उद्धव एकत्र येणार?

TCS Layoffs: TCSमध्ये 30 हजार नोकरकपात? आयटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं सावट

Nilesh Ghaywal : खाकीचा खुळखुळा, गँगस्टर पळाला; निलेश घायवळला पळवणारे पुणे पोलिसांमध्ये कोण? VIDEO

Black Pepper : दररोज काळीमिरी खाल्ल्याने आरोग्याला होतात 'हे' भन्नाट फायदे

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला खोटा? अहवालात नेमकं काय?

SCROLL FOR NEXT