'विठ्ठल रुक्मिणी'ची प्रक्षाळ पूजा संपन्न; आज पासून देवाचे राजोपचार सुरू भारत नागणे
महाराष्ट्र

'विठ्ठल रुक्मिणी'ची प्रक्षाळ पूजा संपन्न; आज पासून देवाचे राजोपचार सुरू

आषाढी वारीच्या (Ashadhi wari) काळात भाविकांना अखंड दर्शन देऊन थकलेल्या विठूरायाची आज प्रक्षाळ पूजा संपन्न झाली.

भारत नागणे

पंढरपूर: आषाढी वारीच्या (Ashadhi wari) काळात भाविकांना अखंड दर्शन देऊन थकलेल्या विठूरायाची आज प्रक्षाळ पूजा संपन्न झाली. आषाढी यात्रेच्या दरम्यान बंद असलेले विठुरायाचे राजोपाचार आज पासुन सुरू झाले. १८ दिवसा पासून थकलेल्या विठूरायाला आज पासून निद्रा मिळणार आहे.

आषाढी सोहळ्यासाठी भाविकांना थेट दर्शन बंद आहे पण ऑनलाइन माध्यमातून भाविक देवाचे दर्शन घेते. गेले १८ दिवस २४ तास दर्शन देवून थकलेल्या विठूरायाची आज प्रक्षाळ पूजा करून राजोपाचारास सुरुवात झाली.

आज दुपारी १२ नंतर देवाला गरम पाण्याने अभ्यंग स्नान घालण्यात आले. याचवेळी संपूर्ण मंदिरही धुवून घेण्यात आले. दुपारी २ नंतर देवाचा शिणवटा घालविण्यासाठी पायाला पिठीसाखर लिंबू चोळले. दुपारी नंतर देवाला दुध दही सह सुगंधी केशर पाण्याने श्री विठ्ठला ला वेद मंत्रांसह पवमान अभिषेक करण्यात आला. यानंतर देवाला सुंदर असा पोशाख केला आहे. यावर मौल्यवान आणि पारंपरिक अलंकार घातले आहेत.

१८ दिवसा नंतर आज देवाला झोप मिळणार असल्याने देवाचा काढून ठेवलेला पलंग आणि बिछाना स्वच्छ करून शयनगृहात बसविण्यात आला. या बिछाण्यावर विविध सुगंधी पारंपारिक अत्तरे लावण्यात आली. या प्रक्षाळ पुजेची परंपरा शेकडो वर्षापासून सुरु असून आजचा दिवस पंढरपुरातील घराघरात साजरा केला जातो. आज देवाला पुरणपोळी सह पंचपक्वानांचा महानेवैद्य दाखविण्यात येतो.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Attack : बिबट्याचा महिलेवर प्राणघातक हल्ला; मुलांसह शेतात कापूस वेचणी करतानाची घटना

Satara Exit Poll: सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप की शिवसेना ठाकरे गट कोण मारणार बाजी? पाहा Exit Poll

Irregular Periods: गरम पाण्यात तूप टाकून प्यायल्यास पिरीयड्सची समस्या होईल दूर; अनिरुद्धचार्यांच्या दाव्यावर तज्ज्ञांची प्रतिक्रिया

Kudal Exit Poll: राणेंचं कडवं आव्हान, वैभव नाईक गड राखणार का? पाहा Exit पोलचा अंदाज

Arjun Kapoor: समांथाच्या कवितेवर अर्जुन कपूरची हटके रिॲक्शन, म्हणाला...

SCROLL FOR NEXT