विठुरायाचे पदस्पर्श दर्शन सुरु करा; वारकरी आक्रमक  SaamTVnews
महाराष्ट्र

विठुरायाचे पदस्पर्श दर्शन सुरु करा; वारकरी आक्रमक

भाजप आध्यात्मिक आघाडी वारकऱ्यांच्या वतीने आज संत नामदेव पायरी जवळ भजन आंदोलन करण्यात आले.

भारत नागणे

पंढरपूर : मागील दोन वर्षाच्या कालावधीपासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे दर्शनासाठी बंद होती. कोरोना (Corona) संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर मंदिरे दर्शनासाठी सुरु करण्यात आली आहेत. मात्र, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात (Vitthal-Rukmini Temple), गाभाऱ्यात जाऊन विठूमाऊलीचे पदस्पर्श दर्शन अद्यापही भक्तांसाठी उपलब्ध नाही.

हे देखील पहा :

कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विठुरायाचे पदस्पर्श दर्शन सुरु करावे या मागणीसाठी भाजप (BJP) आध्यात्मिक आघाडी वारकऱ्यांच्या वतीने आज संत नामदेव पायरी जवळ भजन आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षापासून भक्तांना विठुरायाचे पदस्पर्श दर्शन बंद आहे. केवळ मुखदर्शन सुरु आहे. दोन वर्षानंतर राज्यात व देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाली आहे.

त्यानंतर देशभरातील सर्वच मंदिरे भक्तांसाठी खुली आहेत. त्यामुळे येत्या गुढीपाडव्यापासून विठुरायाचे पदस्पर्श दर्शन सुरु करुन देव आणि भक्तांची भेट घडवून द्यावी अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी भाजपा आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली शेकडो वारकऱ्यांनी विठ्ठल मंदिराला प्रदक्षणा घालून नामदेव पायरीजवळ भजन आंदोलन केले. यावेळी मंदिर समितीला निवेदन देण्यात आले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यात

School Closed : शाळा - महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, नाशिक जिल्हा प्रशासनाचा निर्णय

Mumbai Tourism : वीकेंडला जोडीदारासोबत निवांत वेळ घालवा, 'ही' आहेत मुंबईतील रोमँटिक अन् सुंदर ठिकाणे

Hingoli Accident: महामार्गावर भयंकर अपघात! खड्ड्यात कार आदळून उलटली, २ तरुणांचा जागीच मृत्यू

Jeera Water: दररोज सकाळी 30 दिवस जिऱ्याचं पाणी प्या; या 5 समस्यांपासून मिळेल आराम

SCROLL FOR NEXT