विठुरायाच्या दर्शनाची तयारी पूर्ण; दररोज 10 हजार भाविकांना मिळणार मुखदर्शन Saam TV
महाराष्ट्र

विठुरायाच्या दर्शनाची तयारी पूर्ण; दररोज 10 हजार भाविकांना मिळणार मुखदर्शन

अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आज दिली.

भारत नागणे

पंढरपूर: श्री विठ्ठल रुक्मिणी चे मुख दर्शन (Vittal Rukmini Temple) आता दररोज १० हजार भाविकांना मिळणार आहे, कोविड चाचणी (Corona Test) गरजेची नसली तरी आरोग्य तपासणी करूनच मंदीरात सोडले जाणार आहे. अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आज दिली. घटस्थापनेच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन भाविकांना मिळणार आहे. या संदर्भातच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची आज बैठक पार पडली. विजया दशमी पासून सकाळी सहा ते सात या वेळेमध्ये पंढरपूर मधील स्थानिक भाविकांना दर्शन दिले जाणार आहे. तर सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने दर्शन दिले जाणार आहे.

दर तासाला सातशे ते एक हजार भाविकांना मुख दर्शनाची व्यवस्था केली आहे. यामधे 50 टक्के ऑनलाईन आणि 50 टक्के ऑफलाईन दर्शन दिले जाणार आहे. दहा वर्षाखालील मुले, ६५ वर्षावरील नागरिक आणि गर्भवती महिलांना शासन आदेशानुसार दर्शनासाठी बंदी कायम ठेवली आहे. दर्शनास येणाऱ्या भाविकांची कोरोना टेस्ट सक्तीची असणार नाही. मात्र दर्शन रांगेत आल्यानंतर सर्व भाविकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. तसेच मंदिरांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी सक्तीची केली आहे.

दरम्यान राज्यात पहिल्या आणि दुसऱ्या लाटे दरम्यान मंदीरं बंद होती. त्यामुळे मंदीरावर अवलंबून असलेले लोक, त्याच नागरिकांना आपल्या देवाचं दर्शन घेता येत नव्हते. आता राज्य सरकारने मिशन बिगीन अगेनच्या अंतर्गत कोरोना नियमांचं पालन करुन लोकांना दर्शन देणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT