Vishwajeet Kadam , bhagat singh koshyari saam tv
महाराष्ट्र

आता कसं लगेच निर्णय घेताहेत; विश्वजीत कदमांची राज्यपालांवर टीका

माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी विविध घडामाेडींवर माध्यमांशी संवाद साधला.

विजय पाटील

Vishwajeet Kadam News : राज्यपाल पद हे संविधानिक पद आहे. या पदाकडे राजकीय हेतूने वागू नये. मी महाराष्ट्रातला (maharashtra) एक नागरिक आणि विधिमंडळाचा सदस्य लोकप्रतिनिधी आहे. सध्या राज्यपाल घेत असलेल्या निर्णयांबद्दल आश्चर्य वाटतं असं माजी मंत्री विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी सांगली येथे नमूद केले.

माजी मंत्री विश्वजीत कदम म्हणाले राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होतं. राज्यपालांना आम्ही आमदारांची यादी पाठवली होती. पण राज्यपालांनी निर्णय घेतला नाही. खरं तर त्यांनी निर्णय घेणं अपेक्षित होतं. दुर्दैवाने हे काही झालं नाही मात्र सरकार बदलल्यामुळे लगेच निर्णय होतो हे आश्चर्यकारक आहे असं कदम यांनी नमूद केले.

दरम्यान अमित शहा हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मिशन 150 जाहीर केले आहे या प्रश्नावर कदम म्हणाले राजकारणात राजकारण होत असते. ते सत्ताधारी आहेत. ते आकडे सांगत असतील. जरी आम्ही विरोधी पक्षातले असलो तरी सुद्धा आम्ही सरकारला जागे करू आणि भांडत राहू जनतेच्या प्रश्नांसाठी आमचे आकडे काय असतील हे योग्य वेळी आम्ही सांगू असेही कदम यांनी स्पष्ट केले.

भाजपमध्ये जाण्याच्या वक्त्याव्यवर कदम म्हणाले राज्याचे ज्येष्ठ नेते थोरात साहेब यांनी अशोक चव्हाण साहेबांच्या बाबतीत ज्या बातम्या येतात त्यावरून त्यांनी वक्तव्य केलेले आहे. त्याच्यावर मी बोलू इच्छित नाही. शिवाय थोरात साहेबांनी वक्तव्य केले असल्यामुळे मी त्याच्यावर वक्तव्य करणे अपेक्षित नाही.

दसरा मेळावा बाळासाहेब ठाकरे गेल्या 30 ते 40 वर्षापासून महाराष्ट्र लोकांकरिता घेत असतात. तो दसरा मेळावा त्या ठिकाणी व्हावा निश्चितच. पण कोर्टात केस दाखल झाल्या असल्यामुळे त्यावर वक्तव्य करणे योग्य नाही. पण जी काही परंपरा आहे ती अखंडित राहावी आणि महाराष्ट्रातल्या लोकांच्या प्रश्नांना आवाज मिळावा अशी माझी इच्छा आहे असं माजी मंत्री कदम यांनी दसरा मेळाव्यावरुन चाललेल्या राजकारणावर नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: ही तर गुजरात नवनिर्माण सेना; उद्धव ठाकरेंची टीका

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

Eknath Shinde : मला जेलमध्ये टाका, मी काय ऐरागैरा नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर नेम

Assembly Election: पक्षाने अजित पवारांना तीनदा उपमुख्यमंत्री बनवलं, आता युगेंद्र; सांगता सभेत शरद पवारांचे आवाहन

हनिमूनला जायचा विचार करताय का? भारतातील 'ही' ५ ठिकाणे आहेत प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT