कोल्हापूर : कोल्हापुरातील (Kolhapur) एका रुग्णालयातील धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. एका रुग्णालयात एक रुग्ण डॉक्टरांच्याकडे तपासणीसाठी आलेला दिस आहे, यावळी डॉक्टरांच्या समोर बसलेल्या रुग्णाचे अचानक हृदय बंद पडले असल्याचे दिसत आहे. यावेळी समोर बसलेल्या डॉक्टरांनी समयसूचकता दाखवत त्या रुग्णाचा जीव वाचवला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेच सध्या चांगलेच व्हायरल झाले आहेत.
मिळेलेल्या माहितीनुसार, हा रुग्ण नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आला होता. यावेळी तो रुग्ण डॉक्टरांसमोर बसला होता. यावेळी त्या रुग्णाचे हृदय अचानक बंद पडले. डॉक्टरांनी लगेच समय सूचकता दाखवत या रुग्णावर उपचार करत त्याला एक प्रकारे जीवदान दिले आहे. कोल्हापुरातील स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये डॉ. अर्जुन आडनाईक यांच्यासमोरच हा प्रकार घडला.
हा सर्व प्रकार डॉ. अर्जून आडनाईक यांच्या सीसीटीव्हीत देखील कैद झाला आहे. डॉ.अर्जून आडनाईक यांनी दाखवलेल्या समाज सुचतेमुळेदेव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय संबंधित रुग्णाला देणार आहे. या घटनेमुळे आता डॉक्टर अर्जुन आडनाईक यांचे कौतुक होत आहे.
खासदार धनंजय महाडिक यांनी हा व्हिडिओ (Video) ट्विट करुन डॉक्टर अर्जुन आडनाईक यांचे कौतुक केले आहे. 'हा व्हिडिओ आपल्यामध्ये अशमाऱ्या खऱ्या नायकाचे उदाहरण दाखवतो. एका रुग्णाचे प्राण वाचवणारे कोल्हापुरातील डॉ. अर्जुन आडनाईक, एक उत्तम हृदयरोगतज्ज्ञ. अशा आदरणीय आणि सद्गुणी वीरांचे मी कौतुक करतो, असं ट्विट खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.