BJP Strengthens Party in Sindhudurg Saam TvNews
महाराष्ट्र

कोकणात भाजपची ताकद वाढली; सावंतवाडीत केसकरांच्या विरोधात ठोकला होता शड्डू, शिवसेनेला धक्का

BJP Strengthens Party in Sindhudurg: विशाल परब यांचा भाजपात पुन्हा प्रवेश होणार. विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून ३५ हजार मतं मिळवली होती. निलंबन मागे घेऊन भाजपकडून घरवापसी निश्चित.

Bhagyashree Kamble

  • विशाल परब यांचा भाजपात पुन्हा प्रवेश होणार.

  • विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून ३५ हजार मतं मिळवली होती.

  • निलंबन मागे घेऊन भाजपकडून घरवापसी निश्चित.

  • त्यांच्या प्रवेशामुळे कोकणात भाजप पक्षाची ताकद वाढणार आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच कोकणात भाजपाची ताकद वाढणार आहे. विशाल परब यांचा आज भाजपात प्रवेश होणार आहे. त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. मात्र, त्यांचं आता निलंबन मागे घेण्यात आलं असून, त्यांची भाजप पक्षात घरवापसी होणार आहे.

विशाल परब हे भारतीय जनता पार्टी पक्षातील नेते आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, आता निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून विशाल परब यांनी दीपक केसरकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.

दीपक केसरकर यांच्या विरोधात त्यांनी तब्बल ३५ हजार मतं मिळवली होती. एका अपक्ष उमेदवाराने एवढी प्रचंड मत मिळवण्याचा विक्रम विशाल परब यांनी केला होता. विधानसभा निवडणुकीत विशाल परब यांनी प्रचंड बहुमत मिळवल्याने, त्यांच्यासाठी शिंदेंची शिवसेना आणि भाजप या दोघांमध्येही प्रवेश देण्यासाठी चढाओढ होती.

अखेर विशाल परब यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे कोकणात भाजप पक्षाची ताकद वाढणार असल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: मुसळधार पावसाने मुंबईची जीवनवाहिनी ठप्प, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक बंद

Marathwada Rain : मराठवाड्यातील पाण्याची चिंता मिटली; प्रमुख ११ धरणाची शंभरीकडे वाटचाल

Kullu Cloudburst Video: कुल्लूमध्ये ढगफुटी; रस्ते खचले, घरं, दुकानं गेली वाहून

Ladki Bahin Yojana: महत्त्वाची बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

Thama: खूनी प्रेम कहानी...; आयुष्मान खुराना आणि नवाजुद्दीन सिद्दीकीचा थरार, रश्मिका मंदानाचा ग्लॅमर, 'थामा'चा जबरदस्त टिझर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT