Virat Kohli Cricket Form Instagram/@virat.kohli
महाराष्ट्र

Virat Kohli: विराट कोहली बनला अलिबागकर! तब्बल ६ कोटींचा बंगल्याचा बनला मालक

विराटने आपल्या विकेंट हाऊससाठी अलिबागची निवड केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> सचिन कदम

अलिबाग : अलिबागच्या निसर्ग सौंदर्याची भुरळ सर्वच सेलिब्रेटींना पडली आहे. यामध्ये क्रिकेटपटू विराट कोहलीची आता भर पडली आहे. कारण विराट कोहली देखील अलिबागकर झाला आहे.

टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीची कमाई नेहमीच चर्चेचा विषय असते. त्याच महागडं पिण्याचं पाणी असो वा मुंबईतील अलिशान घर. विराट कोहली विविध ठिकाणी गुंतवणूक करत असतो. (Latest Sports Updates)

विराटने आपल्या विकेंट हाऊससाठी अलिबागची निवड केली आहे. आवास लिव्हिंग अलिबाग एलएलपी या प्रकल्पात त्याने बंगला खरेदी केला आहे. आज त्याच्या अनुपस्थितीत त्याचा भाऊ विकास कोहली याने अलिबागच्या दुय्यम निबंधक कार्यालयात हा व्यवहार पूर्ण केला.

दोन हजार चौरस फुटाच्या या बंगल्याची किंमत तब्बल 6 कोटी रुपये इतकी आहे. यामध्ये 400 चौरस फुटांचा स्वीमिंग पूल देखील आहे. सचिन तेंडुलकर, रवि शास्त्री, अजित वाडेकर, रोहित शर्मा यांच्या पाठोपाठ आता विराट देखील अलिबागकर झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laxman Hake: मोठी बातमी! ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात गेवराईत गुन्हा दाखल

Maharashtra Live News Update : जनसुरक्षा विधेयकाविरोधात शिवाजी पार्कात आंदोलन

Petrol Diesel :...तर तुम्हाला पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Politics : ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी, शिवाजी पार्कवर उद्धव यांच्यासह राजही दिसणार?

Breast Cancer : ब्रेस्ट कॅन्सर न होण्यासाठी कोणते पदार्थ टाळावे?

SCROLL FOR NEXT