Virar 12th board answer sheets burn Saam Tv News
महाराष्ट्र

Exam Answer Sheet : बारावीच्या उत्तपत्रिका जळून खाक, विद्यार्थ्यांचं भवितव्य राख; शिक्षिकेचा हलगर्जीपणा नडला

Virar 12th Board Answer Sheets Burn : विद्यार्थ्यांचं भविष्य ठरवणाऱ्या बारावीच्या पेपरची शिक्षिकेच्या हलगर्जीपणामुळे राख झालीय. मात्र हे प्रकरण काय? शिक्षणमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलंय?

Tejal Nagre

पालघर : मान पाठ एक करून विद्यार्थी बारावी बोर्डाच्या परिक्षेची तयारी करत असतात. मात्र इतकी मेहनत करून विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या पेपर्सची एका शिक्षिकेच्या हलगर्जीपणानं अक्षरश: राख झालीये. विरार पश्चिमेकडील राहणाऱ्या एका शिक्षिकेने सर्व नियम धाब्यावर बसवत बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी चक्क घरी नेल्या आणि 10 मार्च रोजी या शिक्षिकेच्या घराला लागलेल्या आगीत या सर्व उत्तरपत्रिका जळून राख झाल्यात १२वीच्या या विषयाच्या 175 उत्तरपत्रिका या आगीत जळाल्या.

या घटनेमुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होतायत

नियमात नसतानाही शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी नेल्याच कशा ?

शिक्षिकेला उत्तपत्रिका घरी न्यायला परवानगी कुणी दिली ?

अशा पद्धतीने नियम धाब्यावर बसवून अजून किती शिक्षक उत्तरपत्रिका घरी नेतात ?

जळालेल्या उत्तरपत्रिका ज्या विद्यार्थ्यांच्या आहेत त्यांचे नुकसान कसे भरून काढणार ?

पुन्हा असे प्रकार घडू नये यासाठी प्रशासन काय काळजी घेणार ?

दरम्यान, शालेय शिक्षणं मंत्र्यांनीही या घटनेची दखल घेत संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.संबंधित शिक्षिकेवर आणि शाळेवर जरी कारवाई झाली तरी शिक्षकांच्या या हलगर्जीपणामुळे ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे हे ते भरून निघणार का? काही दिवसांपूर्वीच नवी मुंबईत उत्तपत्रिकांचा एक गठ्ठा रस्त्यावर पडलेला आढळला. तर लातूरमध्ये चालत्या बसमध्ये एक शिक्षक पेपर तपासताना दिसला. यामुळे राज्यभरातले अनेक शिक्षक नियमांना बगल देत उत्तपत्रिका घरी नेत असल्याचे समोर आलंय. अशा शिक्षकांवर कडक कारवाई होणार का? हेच पाहायचंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT