Virar Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Virar Crime News: प्रेयसीने प्रियकरासोबत धूम ठोकली; जाता जाता पाठवलेल्या 'व्हॉईस नोट'मुळे पोलीसही लागले कामाला

Crime News Today: अल्पवयीन मुलीने पाठवली होती अपहराणाची व्हॉईस नोट

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

चेतन इंगळे

Virar News Today: विरार बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन तरुणीने व्हाट्सअ‍ॅपवर ‘व्हॉईस नोट’ पाठवून अपहरण झाल्याचा सांगितल्याने खळबळ उडाली होती. मात्र या या तरुणीने स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला असून ती आपल्या प्रियकरासोबत विमानाने कोलकत्याला पळून गेल्याचे निष्पन्न झाले आहे. तिला ताब्यात घेण्यासाठी अर्नाळा सागरी पोलिसांचे एक पथक कोलकत्याला रवाना झाले आहे. (Latest Marathi News)

विरार येथे रहाणारी १७ वर्षीय तरुणी शुक्रवारी सकाळी कामावर जाण्यासाठी निघाली होती. मात्र ती कामावर गेली नव्हती. तिच्या कुटुंबियांनी शोध सुरू केला होता. दरम्यान रात्री साडे अकरा वाजता तिने भावाच्या मोबाईलच्या (Mobile) व्हाट्सअ‍ॅप वर एक ‘व्हॉइस नोट’ पाठवली. माझे एका व्यक्तीने अपहरण केले असून ट्रेन मधून अज्ञात ठिकाणी घेऊन जात असल्याचे सांगितले. यामुळे घाबरलेल्या तिच्या कुटुंबीयांनी अर्नाळा सागरी पोलीस ठाणे गाठले. (Crime News)

पोलिसांनी या गंभीर प्रकरणाचा लगेच तपास सुरू केला. त्यावेळी ही मुलगी ट्रेन मधून मध्ये तर विमानातून पळून गेल्याचे निष्पन्न झाले. तिच्या शेजारच्या एका इसमाबरोबर ती कोलकत्याला गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे एक पथक तिला घेण्यासाठी कोलकात्याला रवाना झाले आहे. या मुलीने स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला होता मात्र ती सुखरूप असून तिच्या परिचयाच्या व्यक्तीसोबत गेली असल्याची माहिती अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस (Police) निरीक्षक कल्याणराव करपे यांनी दिली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur : फटाके आणायला गेले,पुन्हा परतलेच नाहीत; बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू, कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Goregaon Crime: इमारतीत शिरून मोबाईल चोरीचा प्रयत्न; ५ जणांकडून बेदम मारहाण, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

Wednesday Horoscope : दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणीत होणार; महत्वाची कामे दुपारनंतर करा, अन्यथा...

Maharashtra Live News Update: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

SCROLL FOR NEXT