Virar Crime Saam Tv
महाराष्ट्र

Virar Crime: विरारमध्ये तळीरामांकडून गॅरेज मालकाला मारहाण, अर्नाळा पोलिसांत गुन्हा दाखल

विरार पश्चिमेमधील ड्रीम व्हील गॅरेज मालकाला तळीराम टोळीने बेदम मारहाण केलीये.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

विरार: विरार पश्चिमेमधील ड्रीम व्हील गॅरेज मालकाला तळीराम टोळीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत गॅरेज मालक गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Virar Crime Garage owner beaten by drunken gang).

नेमकं काय घडलं?

विरारच्या (Virar) अर्नाळामध्ये सकाळी 6 च्या सुमारास गॅरेज बंद असताना 7 ते 8 जण मद्यपान (Drink) करत गॅरेज परिसरात बसले होते. गॅरेजच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना जेव्हा विचारणा केली, तेव्हा सुरक्षारक्षकांला मारहाण (Beat) करत त्याला तेथून पळवले.

ड्रीम व्हील गॅरेजचे मालक फिरोज खान यांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ गॅरेजवर (Garage) धाव घेतली. त्यांनी सुरक्षारक्षकाला का मारले याची विचारणा केली असता, तळीरामांच्या टोळीने फिरोज खान यांना बिअर बॉटल आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या मारहाणीत ते गंभीर जखमी (Injured) झालेत. गॅरेज मालक फिरोज खान यांना डोक्यावर 15 टाके आणि पायावर गंभीर दुखापत झाली आहे.

या संपूर्ण घटनेची माहिती विरार अर्नाळा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फिरोज खान यांना शेजारी असलेल्या ग्लोबळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याप्रकरणी अर्नाळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास अर्नाळा पोलीस करत आहेत.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

Pune Politics : पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ; जिल्ह्याची सुभेदारी महायुतीकडे का गेली? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT