सांगलीत राडा, जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पती-दिराला मारहाण

वॉटर टेंडर वरून मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.
Sangli Police Station
Sangli Police Stationविजय पाटील
Published On

सांगली - जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या पतीला आणि दिराला जिल्हा परिषदेच्या सदस्या कडून मारहाण करण्यात आली आहे. सांगली (Sangli) मध्ये जिल्हा परिषद शासकीय बंगल्यात जाऊन ही मारहाण करण्यात आली आहे. अंगणातील कुंड्याची थोडफोड करत मारहाण करण्यात आल्याचा आरोप जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या पतीने आणि दिराने केली आहे. वॉटर टेंडर वरून मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील पहा -

याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या सभापतीसह जिल्हा परिषदेच्या पाच सदस्यांवर तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष यांना मारहाण करणाऱ्या काही सदस्य आणि सभापती यांनी हे आरोप फेटाळले आहेत. उलट आम्हाला जिल्हा परिषद निवासस्थानी बोलावून मारहाण करण्यात आली असा आरोप जिल्हा परिषदेच्या सदस्यांकडून करण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com