vipul khaire News, Nashik Crime News, Nashik Latest Marathi News
vipul khaire News, Nashik Crime News, Nashik Latest Marathi News saam tv
महाराष्ट्र

Nashik: भद्रकाली पाठाेपाठ आनंदवलीत विद्यार्थ्याचा खून; पाेलीस तपास सुरु

साम न्यूज नेटवर्क

- तबरेज शेख

नाशिक : नाशिक (nashik) शहरात सकाळीच भद्रकाली हद्दीत खुनाची घटना घडली असताना अवघ्या काही तासात दुसरी खुनाची घटना घडली आहे. यामुळे शहरात (city) भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आनंदवली शिवारातील बेंडकुळे नगर येथे विपुल खैरे (vipul khaire) याचा खून करण्यात आला आहे. विपुल हा अभोणा येथे डी फार्मसीचे शिक्षण घेत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून तो या परिसरात कसा आला याबाबत गुढ वाढले आहे. (Nashik latest Marathi news)

याबाबत पोलिसांनी (police) दिलेली माहिती अशी डिजीपी नगर येथील राहणारा विपुल रतन खैरे हा अभोणा येथे डी फार्मसीचे शिक्षण घेत होता. काही नागरीक फिरत असताना त्यांना दुचाकी व एक बॅग पडलेली दिसली. थोड्या अंतरावर पाहिले असता निर्जनस्थळी एक मृतदेह असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ पाेलीसांना याची माहिती दिली.

दरम्यान मृतदेहाच्या अंगावर खरचटल्याच्या खुना मिळून आल्या आहेत. पाेलीसांनी संबंधित युवकाच्या कुटुंबियांशी संपर्क साधला आहे. तो अभोणा येथे गेला होता. या ठिकाणी कसा अला यावर कुटुंबियांनी संशय व्यक्त केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या युवकाचा खून झाल्याचे अहवाल नुसार स्पष्ट झाले आहे. गंगापूर पोलिस ठाण्यात अज्ञातांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : दादर पूर्वमधून १.१४ कोटींची रोकड जप्त

Divorce: नवऱ्याने तोंडाला केक लावल्याने नवरी भडकली; लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घटस्फोट

Covid Vaccine Side Effects: मोठी बातमी! कोरोना लसीचे गंभीर दुष्परिणाम होतात, कंपनीने न्यायालयासमोर आरोप स्वीकारले

Rohit Sharma Birthday Special: शाळेची फी भरायला पैसे नव्हते, आता आहे २०० कोटींचा मालक! वाचा रोहित शर्माचा प्रवास

Summer Health Care: उन्हाळ्याच्या दिवसात मुलांना ACमध्ये झोपवताय? तर घ्या 'या' गोष्टीची काळजी

SCROLL FOR NEXT