Sanjay Raut Saam Tv
महाराष्ट्र

Shivsena: 'आज एक जबरदस्त बॉम्ब फुटेल, आम्ही संजय राऊतांच्या पाठीशी'

संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर सातत्याने प्रहार सुरु ठेवला आहे.

अमोल कलये

रत्नागिरी : शिवसेना (shivsena) खासदार संजय राऊत (sanjay raut) यांची आज (मंगळवार) दुपारी चार वाजता शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद होणार आहे. शिवसेनेचे नेते यशवंत जाधव आणि युवा सेनेचे पदाधिकारी राहूल कनाल (rahul kanal) यांच्यावर आयकर विभागाने कारवाई केल्याने आता दुपारी खासदार राऊत काय बाेलणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून राहिली आहे. दरम्यान खासदार संजय राऊत हे आजच्या पत्रकार परिषदेत जबरदस्त बॉम्ब फोडतील असा विश्वास व्यक्त करीत खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांनी विराेधकांना सूचक इशारा दिला आहे. (sanjay raut latest marathi news)

संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर सातत्याने प्रहार सुरु ठेवला आहे. ईडी तसेच अन्य यंत्रणांचा भाजप गैरवापर करीत असल्याचा त्यांचा आराेप आहे. याबराेबरच किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि नील सोमय्यांना (Neil Somaiya) त्यांनी टार्गेट करुन दाेघांना जेलमध्ये टाकणार असल्याचे म्हटलं हाेते.

आजच्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत नेहमीप्रमाणे एक जबरदस्त बॉम्ब फोडतील असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे. ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकारच्या (mva) मुळावर जे येताहेत त्यांचा बिमोड करण्याचा निर्धार संजय राऊत यांनी केलेला आहे. त्यामुळे आम्ही सर्वजजण त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत असेही खासदार राऊत यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care : उन्हाळ्यात डोके खाजवून हैराण झालात? 'हा' आहे कोंड्यावर रामबाण उपाय

UIDAI Internship: आधार बनवणाऱ्या कंपनीत काम करण्याची सुवर्णसंधी, UIDAI मध्ये इंटर्नशिप; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Mumbai Pune Expressway: गुड न्यूज! मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार; कधीपासून येणार सेवेत?

Maharashtra News Live Update: रक्ताचं पाणी होईपर्यंत वहिनींच्या पाठीशी उभे राहू : हसन मुश्रीफ

भाजप कार्यकर्त्याच्या घरावर बॉम्ब फोडला, आवाजाने परिसर हादरला; बचाव पथक मदतीला धावलं

SCROLL FOR NEXT