Koregoan: चीट बॉय, अधिकाऱ्यांचे संगनमत? 'जरंडेश्वर' च्या प्रशासनाने आराेप फेटाळले

उलट काही लोक आपला लेट ऊस लवकर जावा यासाठी आरोप करताहेत.
jarendeshwar sugar factory
jarendeshwar sugar factorysaam tv

सातारा : जरंडेश्वर साखर कारखान्याच्या (jarendeshwar sugar factory) ऊस तोडीच्या बाबत शेतकी अधिकारी आणि चिट बॉय यांच्याकडून शेतकऱ्यांची (farmers) लूट होत असल्याचे आरोप एका शेतकऱ्याने व्हिडिओच्या माध्यमातून केले होते. याबाबतचे वृत्त साम टीव्हीने दाखवल्यानंतर कारखाना प्रशासनाने भूमिका स्पष्ट करत शेतक-याचे सर्व आरोप धुडकावून लावले आहेत. (jarendeshwar sugar factory latest marathi news)

या कारखान्याचे जनरल मॅनेजर विजय जगदाळे साम टीव्हीशी बाेलताना म्हणाले प्राध्यापक शेतकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया नुसार असा प्रकार कुठेही घडत नाही. आमचे चिट बॉय किंवा कर्मचारी पैशाची मागणी करत नाही. उलट काही लोक आपला लेट ऊस लवकर जावा यासाठी आरोप करताहेत.

jarendeshwar sugar factory
रशिया-युक्रेन वाद: दुपारी साडे बारापासून ४ शहरांत तात्पूरता युद्धविराम

दुसरी गोष्ट आहे की तोडणी करणारे जे बीड (beed) भागातून मजूर येतात ते पैशांची मागणी करतात आणि त्याचा अपभ्रंश व गैरसमज करून दिला जातो जास्त पैसे कुणीही मागत नाही कारण त्यांना प्रशासनाकडून तेवढ्या कडक सूचना दिल्या जात असतात. कारखान्याची ऊसतोड वाई (wai) पासून ते विट्यापर्यंत (vita) चालती. कुठे अशी तक्रार नाही परंतु ही प्रतिक्रिया आल्या त्या कुठल्या हेतून आलेत याचा आम्हांला शोध घ्यावा लागेल. जरंडेश्वर कारखान्याची कामाची पद्धत पारदर्शक आहे असेही विजय जगदाळेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

jarendeshwar sugar factory
Nari Shakti Purskar: महाराष्ट्रातल्या तीन महिलांना केंद्राचा ‘नारी शक्ती पुरस्कार' जाहीर
jarendeshwar sugar factory
नाद खूळा! महिला पोलिस कॉन्स्टेबलने केले अजित पवारांचे सारथ्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com