vinayak raut  saam tv
महाराष्ट्र

Vinayak Raut : नारायण राणेंनी तिकीट मिळवून दाखवावं, मग धमकीची भाषा वापरावी; विनायक राऊत यांचं ओपन चॅलेंज

Vinayak Raut Latest news : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर केलल्या टीकेचा खरपूस समाचार ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी घेतला आहे.

Vishal Gangurde

विनायक वंजारे, सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर केलल्या टीकेचा खरपूस समाचार ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी घेतला आहे. नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिल्यानंतर विनायक राऊत यांनी टीका केली. 'नारायण राणे यांनी आधी लोकसभेचं तिकीट मिळवून दाखवावं. त्यानंतर धमकीची भाषा वापरा, असा शब्दात विनायक राऊत यांनी नारायण राणेंना ओपन चॅलेंज दिलं.

खासदार विनायक राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना नारायण राणेंवर टीका केली. 'कोणाच्या बापाचा बाप जरी आला तरी उद्धव ठाकरेंना रोखण्याची कोणाची हिंमत नाही. नारायण राणे यांची धमकीची भाषा ऐकण्याचे दिवस आता गेले आहेत. राणेंनी धमकी द्यायची. नितेश राणेंनी सरपंचांना धमकी द्यायची. निलेश राणेंनी मिमिक्री करायची, एवढ्यासाठीच राणे कुटुंब राहिलेलं आहे, अशी टीका विनायक राऊतांनी केली.

'नारायण राणे हे केंद्रीय लघू व मध्यम उद्योग खात्याचे जिल्ह्यातील पहिले लाभार्थी आहेत. लोकांचं भलं करण्यापूर्वी स्वत:चं भलं करायला निघाले आहे, असा आरोप विनायक राऊत यांनी केला.

नारायण राणे यांच्या आरोपावर भाष्य करताना राऊत म्हणाले, ' नारायण राणेंनी नरेंद्र मोदी आणि अमित शहांची सगळी यंत्रणा कामाला लावा आणि माझ्या मुलाने पैसे घेतले हे सिद्ध करा. अन्यथा राणेंनी तोंड बंद करावं आणि हिमालयात जावे. स्वत: दुसऱ्याची पारख करण्याची सवय राणेंना आहे. टक्केवारी तुमचा मुलगा काम करतो. ठेकेदाराने पैसे दिले नाही म्हणून ब्रिजवर नेऊन त्यांना चिखल मारता'.

आशिष शेलार यांनी आज विनायक राऊत यांना पराभवासाठी शुभेच्छा, असा खोचक टोला लगावला. आशिष शेलार यांच्या टीकेला उत्तर देताना विनायक राऊत म्हणाले, 'आशिष शेलार सारखा नौटंकी करणारा माणूस मी महापालिकेपासून बघत आहे. त्यांना फार किंमत द्यायची गरज नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur News :...तर अधिकाऱ्यांना घरी पाठवणार; बदलापुरात वीजपुरवठा आणि पाणीपुरवठ्यावरून शिंदे गट आक्रमक

Dhule News: अवैधपणे गर्भपात करण्यासाठी औषध विक्री करणाऱ्या डॉक्टरचा भांडाफोड

Ghanshyam Darode: बदनामी करणाऱ्यांवर करावाई करा; नाहीतर आत्मदहन करेन, घनश्याम दरोडेचा इशारा

Weakness: सतत थकवा जाणवतोय, असू शकतं 'हे' गंभीर आजार

Holiday : ७ जुलैला मिळणार सार्वजनिक सुट्टी! शाळा, बँका, बाजार… काय बंद राहणार?

SCROLL FOR NEXT