Vinayak Raut Narayan Rane| Maharashtra Politics Breaking News:  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मोठी बातमी! नारायण राणेंच्या 'खासदारकीला' हायकोर्टात आव्हान, विनायक राऊत यांच्याकडून याचिका दाखल; VIDEO

Maharashtra Politics Breaking News: भाजप नेते नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे. नारायण राणे यांनी मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे.

Gangappa Pujari

आदेश तांदळे| मुंबई. ता. १३ जुलै २०२४

एकीकडे विधानपरिषद निवडणुकीतील विजयाचा जल्लोष सुरू असतानच भारतीय जनता पक्षाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांच्या विजयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी हायकोर्टात आव्हान दिले आहे. नारायण राणे यांनी मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, भाजप नेते नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि लोकसभेचे पराभूत उमेदवार विनायक राऊत यांनी ही याचिका दाखल केली आहे. निवडणूकीत राणे यांनी मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.

नारायण राणे यांनी मतदारांना धमकावून, पैसे वाटून मिळवलेला विजय रद्द करा तसेच निवडणूक काळातील भ्रष्टाचाराची स्वतंत्र चौकशी करा अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. आता याबाबत हायकोर्ट काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, रत्नागिरी- सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघामध्ये भाजप नेते नारायण राणेंविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्यामध्ये लढत झाली होती. या निवडणुकीत  नारायण राणे यांचा 47858 मतांनी विजय झाला होता. मात्र हा पैशाचा जिवावर झालेला विजय असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकीचा लाभ घेणाऱ्यांपैकी ८३ टक्के महिला विवाहित, तर फक्त ४.७ टक्के विधवा, आकडेवारी आली समोर

Famous Singer Threat Call: बादशाहनंतर आणखी एका प्रसिद्ध गायकाला जीवे मारण्याची धमकी; फोनवरून दिला सावध राहण्याचा इशारा

Viral Video: बोलता बोलता अचानक खाली कोसळली महिला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं

Vatana Batata Bhaji Recipe: गुढीपाडव्याला पुरी सोबत खाण्यासाठी बनवा स्पेशल वटाणा बटाटा भाजी, सोपी आहे रेसिपी

Water Metro : मुंबईकरांचा प्रवास आता लाटांवरून! 'वॉटर मेट्रो'साठी फडणवीसांचा मास्टरप्लॅन, ३ टप्प्यांत बदलणार शहराचा चेहरा

SCROLL FOR NEXT