विनायक मेटे
विनायक मेटे  SaamTvNews
महाराष्ट्र

Beed : दोन दिवसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा; अन्यथा रस्त्यावर उतरू

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे. शेतात होत्याचं नव्हतं झालंय. मात्र, या मायबाप सरकारला अद्याप जाग आली नाही. शेतकऱ्यांना केवळ मदत जाहीर केली आहे, प्रत्यक्षात मदत अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही.

हे देखील पहा :

त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसांमध्ये या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, तर शिवसंग्राम रस्त्यावर उतरेल. असा इशारा आमदार विनायक मेटे यांनी दिला आहे. जिल्ह्यात जवळपास सहा लाख हेक्‍टरवर शेतकऱ्यांचे नुकसान झालंय. सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केलीय, मात्र ती देखील शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नाही.

त्यामुळे दसरा सण तर गेलाय, मात्र येणारी दिवाळी कशी करावी ? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. यामुळे येणाऱ्या दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मदत पोहोचली नाही. तर शिवसंग्राम मोठं आंदोलन करत, मोर्चा काढेल. असा इशारा शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिला आहे. ते बीडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट; एक किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला, घरांची पडझड VIDEO

Virat Kohli Crying : आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहली रडला; अनुष्कालाही फुटला अश्रूंचा बांध, VIDEO व्हायरल

Monsoon Update 2024: आनंदवार्ता! येत्या ४८ तासांत मान्सून होणार भारतात दाखल; महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस

Mithun Rashi Personality : मिथुन राशीची लोक कशी असतात? त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या राशीबद्दल

Horoscope Today : सुखाची बरसात होईल, संधीचे सोने करून घ्या; जाणून घ्या तुमचे रविवारचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT