संसार उघड्यावर टाकून पाटणच्या खोऱ्यातील गावेच्या गावे होऊ लागली मोकळी Saam Tv
महाराष्ट्र

संसार उघड्यावर टाकून पाटणच्या खोऱ्यातील गावेच्या गावे होऊ लागली मोकळी

आता घाबरलेल्या वस्त्याच्या वस्त्या संसार उघडा टाकून गाव सोडून जाऊ लागल्या आहेत.

ओंकार कदम

सातारा: कोयना-पाटणच्या खोऱ्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला, एका क्षणात होत्याचे नव्हतं केलं ज्या पावसाकडे डोळे लावून वाट बघायला लागायची त्या पावसाचं नुसतं नाव जरी काढलं तरी आता या लोकांच्या अंगाचा थरकाप उडत आहे. आता या भागात पावसाने बऱ्यापैकी उसंत घेतली आहे.

परंतु आता घाबरलेल्या वस्त्याच्या वस्त्या संसार उघडा टाकून गाव सोडून जाऊ लागल्या आहेत. ओसरलेल्या ओढ्या-नाल्याच्या प्रवाहातून आपला जीव मुठीत धरून ही लोकं हाताला लागेल तेवढा संसार घेऊन गावाला पाठ दाखवून जीव वाचवण्यासाठी बाहेर पडत आहेत. अशाच पाटण तालुक्यातील दुर्गम धनावडेवाडी व शिंदेवाडी येथील ३२ कुटुंबे आज पावसाची थोडी उघडीप मिळताच गाव सोडून ढेबेवाडीत आश्रयाला आली आहेत.

या गावात दळण वळणासाठी असणारा पूल 4 दिवसांपूर्वी अक्षरशः तुटून कोसळला पाण्याचा प्रवाह एवढा होता की गावातून बाहेर पडणे मुश्किल झालं होतं. एकीकडे कोसळणारा पाऊस तर दुसरीकडे दरडी कोसळण्याची भीती आशा परिस्थितीत हे लोक तब्बल 4 दिवस जीव मुठीत धरून बसले होते. अखेर सातारा जिल्ह्यातील पोलीस व महसूल प्रशासनाने भरून वाहणाऱ्या वांगनदीच्या पात्रात मानवी साखळी तयार करून त्या सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढले. ३२ कुटुंबात ८० जणांचा समावेश असून ढेबेवाडी येथील साईमंगलम कार्यालयात त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Border-Gavaskar Trophy: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी टीमची घोषणा; पर्थ टेस्टमध्ये 'हा' ओपनर करणार डेब्यू

Maharashtra News Live Updates: ज्याला पाडायचे त्याला पाडा - मनोज जरांगे

Nashik Crime : अनैतिक संबंधाला अडथळा, मावसभावाने काढला भावाचा काटा, नाशिक हादरले!

Singham Again Vs Bhool Bhulaiyaa 3: रूह बाबा की सिंघम, बॉक्स ऑफिसवर कुणाची चलती?

Hemoglobin: हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काय खावे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT