झिराड ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ 100 टक्के लसवंत... राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

झिराड ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ 100 टक्के लसवंत...

पालकमंत्री अदिती तटकरे ने केले ग्रामपंचायतीचे कौतुक...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड - अलिबाग Alibag तालुक्यातील झिराड ग्रामपंचायती हद्दीतील नागरिकांचे 100 टक्के कोरोना लसीकरण Corona Vaccination पूर्ण झाले आहेत. रायगड Raigad जिल्ह्यातील 810 ग्रामपंचायतीपैकी झिराड ग्रामपंचायतीला गावात 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे झिराड ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचा  प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.

राजीप सदस्य दिलीप भोईर Dilip Bhoir यांच्या नियोजनबद्ध आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्यातून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. पालकमंत्री अदिती तटकरे यांनीदेखील झिराड ग्रामपंचायतील नागरिकांचे 100 टक्के लसीकरण पूर्ण केल्याबद्दल दिलीप भोईर आणि प्रशासनाचे कौतुक केले आहे.

हे देखील पहा -

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आणि प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसल्याने अनेकांना या आजाराची लागण झाली. अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोना प्रतिबंधात्मक लस निर्मिती झाल्यानंतर शासनाकडून लस पुरवठा होऊ लागला. मात्र शासनाकडून येणाऱ्या लसीचा पुरवठा आणि नागरिकांची संख्या पाहता सर्वानाच लस मिळणे शक्य नव्हते.

आपल्या झिराड गावातील आणि तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी राजीप सदस्य दिलीप भोईर यांनी पुढाकार घेतला. झिराड ग्रामपंचायत हद्दीतील उद्योगपती बंगलेधारक यांच्या सहकार्यातून खाजगी पद्धतीने लसीकरण मोहीम हाती घेतली. खाजगी माध्यमातून 15 हजार 850 तर शासनाकडून 1700 लसीचा साठा उपलब्ध करून तीन ते चार महिन्यात झिराड ग्रामस्थांचे दोन्ही डोस देऊन 100 टक्के लसीकरण पूर्ण केले.

ग्रामीण प्रगती फौंडेशनच्या माध्यमातून आज 1 हजार डोस उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकाचेही लसीकरण होणार आहे. पालकमंत्री अदिती तटकरे यांनी आज झिराड शाळेत सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेचे उद्घाटन   केले. यावेळी झिराड ग्रामपंचायत आणि दिलीप भोईर यांनी सामाजिक संस्थांच्या आणि व्यक्तीच्या माध्यमातून केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. झिराडकरांना 100 टक्के लसवंत केल्याने दिलीप भोईर यांचे विशेष कौतुकही केले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT