viral news  Saam tv
महाराष्ट्र

संतप्त गावकऱ्यांचा भोंदूबाबाला चोप, गावकऱ्यांनी कशी घडवली अद्दल? VIDEO

ashok Kharat case : खरात प्रकरणामुळे भोंदूगिरीवरून लोकांचा चांगलाच विश्वास उडालाय... श्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणुक करणाऱ्या अशाच दोन भोंदूंना एका गावात चोप देण्यात आलाय... या भोंदूबाबांनी गावकऱ्यांची कशी फसवणुक केली ? गावकऱ्यांनी त्यांना कशी अद्दल घडवली ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

Suprim Maskar

अंगावर भगवी वस्त्र, कपाळावर भस्म आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा... हे दोन साधू गावात शिरले..आणि दारोदार फिरू लागले..मात्र गावाने या साधूंच स्वागत कसं केलं ते पाहा....

भोंदू खरातच्या प्रकऱणानंतर आता ग्रामीण भागातही भोंदूबाबांविरोधात संतापाची लाट उसळललीय..'दुःख निवारण' आणि 'समस्या सोडवण्या'चे आमिष दाखवून महिलांना लुटणारी ही भोंदूची टोळी दोन महिन्यांपूर्वी गावात शिरली होती... पाईट-सावंतवाडी परिसरात एका महिलेकडून या भोंदूंनी तब्बल 5 हजार रुपये उकळले... आणि त्यानंतर पसार झालेली ही टोळी दोन महिन्यांनी पुन्हा त्याचं गावात आली... मात्र गावात हे भोंदू पुन्हा गावात आल्याचं कळताच नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला आणि आजोबांनी थेट काठीनचं या भोंदूंना प्रसाद दिला...

त्यातही स्वत:ला नाथबाबा म्हणवणाऱ्या या भोंदूंची साधी आरती म्हणतानाही ततपप झाली...

दरम्यान खरात प्रकरणामुळे बुवाबाजीच्या नावाखाली वर्षानुवर्षे फसवणुक करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणलेत.... आधीच खरात प्रकरणामुळे पुरोगामी महाराष्ट्राची देशात बदनामी झाली... अशातच खेडमधील भोंदू बाबांना चोपून ग्रामिण भागातील नागरिकांनी आपला विवेक आजही शाबुत आहे हे दाखवून दिलंय. त्यामुळे अधिकारी नेते उद्योगपतींनी या अशा बुवाबांबाच्या दरबारात हजेरी लावण्याऐवजी आपली सदसदविवेक बुद्धी वापरली तर अनेक अपराध कमी होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Global Economic Crisis : युद्धाची धग, घरोघरी पेटणार वणवा; जगात मंदी येणार?

मराठीची रचना जैनांनी केली, मुंबईत जैन विद्यापीठ हवे - जैन मुनी

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारेंचे आरोप धादांत खोटे; तक्रार असल्यास मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावेत - दीपक साळुंखे

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

SCROLL FOR NEXT