रायगड जिल्ह्यातल्या झिराड ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ झाले १०० टक्के लसवंत राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

रायगड जिल्ह्यातल्या झिराड ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ झाले १०० टक्के लसवंत

रायगड जिल्ह्यातील झिराड ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ १०० टक्के लसवंत झाले आहेत. पालकमंत्री अदिती तटकरे यांनी या ग्रामपंचायतीचे कौतुक केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर, रायगड

रायगड: जिल्ह्यातील झिराड ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ १०० टक्के लसवंत झाले आहेत. पालकमंत्री अदिती तटकरे यांनी या ग्रामपंचायतीचे कौतुक केले आहे. दिलीप भोईर यांच्या नियोजनाने आणि सामाजिक संस्थांच्या हातभराने ग्रामस्थांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

हे देखील पहा -

अलिबाग तालुक्यातील झिराड ग्रामपंचायती हद्दीतील नागरिकांचे १०० टक्के कोव्हिड लसीकरण पूर्ण झाले आहे. रायगड जिल्ह्यातील ८१० ग्रामपंचायतींपैकी झिराड ग्रामपंचायतीला गावात १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे झिराड ग्रामपंचायत हद्दीत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. रायगड जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर यांच्या नियोजनबद्ध आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्यातून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. पालकमंत्री अदिती तटकरे यांनीही झिराड ग्रामपंचायतील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण केल्याबद्दल दिलीप भोईर आणि प्रशासनाचे कौतुक केले आहे.

कोरोना विषाणू प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आणि प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसल्याने अनेकांना या आजाराची लागण झाली. अनेकांना कोरोनामुळे मृत्यू आला. कोरोना प्रतिबंधात्मक लस निर्मिती झाल्यानंतर शासनाकडून लस पुरवठा होऊ लागला. मात्र शासनाकडून येणारा लसींचा पुरवठा आणि नागरिकांच्या संख्या पाहता सर्वांनाच लस मिळणे शक्य नव्हते. आपल्या झिराड गावातील आणि तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी दिलीप भोईर यांनी पुढाकार घेतला. झिराड ग्रामपंचायत हद्दीतील उद्योगपती बंगलेधारक यांच्या सहकार्यातून खाजगी पद्धतीने लसीकरण मोहीम हाती घेतली. खाजगी माध्यमातून 15 हजार 850 तर शासनाकडून 1700 लसींचा साठा उपलब्ध करून तीन-चार महिन्यांत झिराड ग्रामस्थांचे दोन्ही डोस देऊन 100 टक्के लसीकरण पूर्ण केले.

ग्रामीण प्रगती फौंडेशनच्या माध्यमातून आज 1 हजार डोस उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांचेही लसीकरण होणार आहे. पालकमंत्री अदिती तटकरे यांनी आज झिराड शाळेत सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेचे उदघाटन केले. यावेळी झिराड ग्रामपंचायत आणि दिलीप भोईर यांनी सामाजिक संस्थांच्या आणि व्यक्तींच्या माध्यमातून केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. झिराडकरांना 100 टक्के लसवंत केल्याने दिलीप भोईर यांचे विशेष कौतुकही केले. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, सरपंच दर्शना भोईर, ग्रामीण प्रगती फौंडेशनचे संस्थापक देवांग नैराला, मंगेश डफळे आदी यावेळी उपस्थित होते.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT