Pandharpur News, Takli to mumbai morcha saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News : 'या' प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी टाकळी ते मुंबई लाॅंगमार्च

या व्यायामशाळेची चाैकशीसाठी सर्व खटाटाेप ग्रामस्थाने केला आहे.

भारत नागणे

Pandharpur : माढा (madha) तालुक्यातील टाकळी येथे आमदार फंडातून बांधण्यात आलेली सुमारे सात लाखांची व्यायाम शाळा फक्त कागदावर अस्तित्वात आहे. प्रत्यक्षात व्यायाम शाळा न बांधातच आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. (Maharashtra News)

या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी टाकळी येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब कळसाईत यांनी टाकळी ते मुंबई असा पायी ‌मोर्चा काढला आहे. मुंबईत पोचल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ते त्यांना या विषयीचे निवेदन देणार आहेत.

सन 2018 साली राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांच्या आमदार निधीतून व्यायाम शाळेच्या बांधकामासाठी सात लाख रूपये मंजूर झाले आहेत. संबंधित ठेकेदार आणि अधिका-यांनी बांधकाम न करताच निधी‌ हाडप केल्याचा आरोप दादासाहेब कळसाईत यांनी केला आहे. गावात कुठे व्यायाम शाळा बांधण्यात आली नाही असा ठराव ग्रामपंचायतीतीने दिला आहे. तरीही कारवाई केली जात नाही. यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना (eknath shinde) भेटून कारवाईची मागणीसाठी पायी मोर्चा काढला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नव्या सरकारचा शपथविधी हा वानखेडे स्टेडियमवर होणार

Eknath Shinde Press Conference: साष्टांग दंडवत! शिंदे- फडणवीस- पवार लाडक्या मतदारांसमोर नतमस्तक; पाहा VIDEO

Amit Thackeray: मुंबईत राज ठाकरेंना धक्का, अमित ठाकरेंचा पराभव; उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने मैदान मारलं

Maharashtra Politcs : सहानभुती संपली, मविआ हारली; आघाडीच्या पराभवाची कारणे काय? वाचा स्पेशल रिपोर्ट

Nawab Malik News : मानखुर्दमध्ये नवाब मलिक यांचा पराभव | Marathi News

SCROLL FOR NEXT