Jejuri
Jejuri saam tv
महाराष्ट्र

Jejuri News : जेजुरी गाव बंद ठेवण्यावर ग्रामस्थ ठाम

मंगेश कचरे

Jejuri News : अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथे विश्वस्त पदाच्या निवडीवरून वाद निर्माण झाला आहे. यामुळे जेजुरी ग्रामस्थांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आज (मंगळवार) बारावा दिवस असून आगामी काळात जेजुरी गाव बंद करण्याचा निर्धार आंदाेलकांनी व्यक्त केला आहे. (Maharashtra News)

जेजुरी खंडोबा मंदिराच्या सात जणांच्या विश्वस्त मंडळात (Jejuri Temple Trust) जेजुरीबाहेरील तब्बल पाच जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णया विराेधात तसेच निवडीसाठी सहधर्मदाय आयुक्तांनी कोणते निकष लावले, असा प्रश्न उपस्थि केला जात आहे. या निवडीविरोधात ग्रामस्थांनी आपला रोष विविध मार्गांनी व्यक्त केला. सध्या जेजुरीत ग्रामस्थांचे चक्री उपोषण सुरू आहे.

सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज शिवराज्याभिषेक दिनी जेजुरीकरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून दुग्धाभिषेक घातला. दरम्यान ग्रामस्थांनी घेतलेल्या एक महत्वाच्या बैठकीत आंदाेलन तीव्र करण्याचा निर्धार केला.

आपल्या मागण्या मान्य न झाल्यास तसेच निकाल बाजूने लागला नाही तर जेजुरी गाव बंद ठेवण्याचे एकमताने ग्रामस्थांनी ठरविले. या बैठकीस ग्रामस्थांसह पुजारी, व्यापारी, दुकानचालक, सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2024, Qualifier 1: KKR vs SRH सामना रद्द होणार? समोर आली मोठी अपडेट

Today's Marathi News Live : सिंहगडाकडे वाहनांसाठी रस्ता बंद

Jalgaon Pune Flight Service : जळगाव- पुणे विमानसेवा होणार सुरू; तिकीट बुकिंग झाली सुरु

Murud-Janjira Fort : पर्यटकांसाठी महत्वाची बातमी; 26 मेपासून जंजिरा किल्ला बंद

Special Report | लोकसभा निवडणूक दिग्गजांचं करिअर घडणार की बिघडणार?

SCROLL FOR NEXT