karad, grampanchayat news, wadgoan haveli saam tv
महाराष्ट्र

हॅलाे दादा ! मी रेडा हापिसात घेऊन आलूया; प्रश्न सुटण्यासाठी ग्रामस्थाची शक्कल (पाहा व्हिडिओ)

आज दुपारच्या सुमारास घडली घटना.

संभाजी थोरात

Grampanchayat News : गेली दाेन वर्ष ग्रामपंचयात घरा जवळील गटाराचा प्रश्न साेडवित नसल्याने ग्रामस्थाने चक्क आज (मंगळवार) रेड्यासह ग्रामपंचायत कार्यालय गाठले. जाेपर्यंत प्रश्न सुटणार नाही ताेपर्यंत कार्यालयातच ठिय्या मांडणार असल्याचे ग्रामस्थाने भूमिका घेतली आहे. हा प्रकार कराड (karad) तालुक्यात आज घडल्याने त्याची चर्चा सातारा (satara) जिल्ह्यात हाेत आहे. (satara latest marathi news)

कराड तालुक्यात वडगांव हवेली हे गाव आहे. या गावातील एक ग्रामस्थ गेली दाेन वर्ष त्याच्या घराजवळ असलेल्या गटाराच्या पाण्याचा त्यांच्या कुटुंबाला माेठा त्रास हाेत आहे. त्याबाबत अनेकदा तक्रारी करुन देखील त्याची दखल घेतली नाही असे ग्रामस्थाचे म्हणणे आहे. (Maharashtra News)

हा प्रश्न सुटावा यासाठी आज त्रस्त ग्रामस्थाने ग्रामपंचायत कार्यालयात चक्क रेडा नेला. ग्रामस्थाने तिस-या मजल्यावरील ग्रामसेवकाच्या कार्यालयात रेड्यासह ठिय्या मांडला. तेथे उपस्थित असलेल्या कर्मचा-यांनी दादा नामक व्यक्तीला फाेन लावून त्याची माहिती दिली.

त्यानंतर संबंधित ग्रामस्थाची दादांनी फाेनवर समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु ग्रामस्थाने तुम्ही आल्याशिवाय मी येथून हलणार नाही अशी भुमिका घेतली. त्यामुळे उपस्थित कर्मचा-यांची भांबेरी उडाली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Spruha Joshi Photos: स्पृहाचं तेजस्वी रूप, हे फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा

राज ठाकरेंनी फटकारल्यानंतर 'पिट्या भाई' दुसरीकडेच फिरले; रमेश परदेशींचा भाजपमध्ये प्रवेश

Crime: पप्पा मला सोडा..., फावडा डोक्यात टाकत मुलाला संपवलं; सुनेच्या प्रेमात वेडा झालेल्या सासऱ्याचं भयंकर कृत्य

कोल्हापुरात राजकारण फिरलं, हसन मुश्रीफ-समरजीत सिंह घाटगेंची युती; कट्टर विरोधक एकत्र कसे आले? VIDEO

Delhi Blast: मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अल-फलाहच्या संस्थापकाला अटक; दिल्ली बॉम्बस्फोटांनंतरची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT